मराठी इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.लक्ष्मीकांत बेर्डे यांचा भाऊ रवींद्र बेर्डे यांचे निधन कर्करोगाशी झुंज अपयशी ७८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.रवींद्र बेर्डे यांनी मराठी सोबतच हिंदीमध्ये
देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.रवींद्र बेर्डे यांना मागील काही वर्षांपासून घशाचा कर्करोग झाला होता.त्यासाठी त्यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचारही सुरू होते.श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना
हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.उपचारानंतर दोन दिवसांपूर्वीच त्यांना घरी देखील सोडले.मात्र आज अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलं, सुना नातवंड असा परिवार आहे.
रवींद्र बेर्डे यांनी एक गाडी बाकी आनाडी, खतरनाक,होऊन जाऊ दे,हमाल दे धमाल,चंगू मंगू,थरथराट,उचला रे उचला,धडाकेबाज,गंमत जंमत,झपाटलेला,भुताची शाळा,हाच सुनबाईचा भाऊ
यांसारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केले होते.तर हिंदीत सिंघम सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली.रवींद्र बेर्डे हे मराठी मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आहेत.अशोक
सराफ,विजय चव्हाण,महेश कोठारे,विजू खोटे,सुधीर जोशी आणि भरत जाधव यांच्याबरोबर त्यांची जोडी चांगलीच गाजली.आजवर त्यांनी विविधांगी भूमिका केल्या आहेत. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीही त्यांनी गाजवली आहे.