हार्ट (हृदय रोग )चा त्रास असेल तर ‘हा’ व्हिडीओ पहा

आज आपण पाहणार आहोत हृदयरोगाची कारणे व उपचार

भारतामध्ये हा आजार झपाट्याने डोकं वर काढत आहे कारण हि तसंच आहे, अयोग्य आहार -विहार आणि वाढता ताण -तणाव.या मध्ये आधी रक्तदाब, हार्ट ब्लॉकेज आणि नंतर हार्ट अटॅक अशा स्टेजेस पाहायला मिळतात.हार्ट अटॅक कॉरोनरी आर्टरीज ब्लॉक झाल्यावर येतो.

लक्षणे –

धाप लागणे, छातीत वेदना ,पायावर सूज येणे,रक्तदाब वाढणे,चक्कर, धडधड होणे,डोकेदुखी हि लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात.

तपासणी –

ECG,ECHO, Angiography, Pet scan.
कारणे  मसालेदार -तेलकट पदार्थ, अनिद्रा, अति मांसाहार, मद्यपान, तंबाखू, आहारातील मिठाचे जास्त प्रमाण

अपथ्य (खाऊ नये )-

शेंगदाणे, वाळलेले खोबरे, ग्रेव्ही, पापड, लोणचे, डालडा, नॉनव्हेज, तिळ, मोहरी, तूर डाळ, पोहे,दही, चहा,काजू,तूप, लोणी,मुळा, आळू, साधे मीठ, बटाटा, वांगी पित्तकारक पदार्थ

पथ्य (खावे )

ज्वारीच्या कन्या, ज्वारीच्या लाह्या, मुगडाळ, दुधी भोपळा, पडवळ, दोडका, काकडी, बिट, गाजर, गवारी, भेंडी, शेवगा, ढबू मिरची,ओले खोबरे पालेभाज्या,घेवडा, भाकरी, भात सफरचंद,चिकू,डाळिंब, मोसंबी, लिंबू, नारळ पाणी, ताक, आंबील,कांदा, लसूण.

आयुर्वेदिक औषध -अर्जुनारिष्ट, सर्पगंधा वटी. हृदयामृत वटी
उपाय –

– साध्या मिठाऐवजी संधव मीठ (उपवासाचे मीठ )खाणे
– सकाळीऐवजी, संध्याकाळी चालणे कारण थंडीत – सकाळी रक्ताचे गोठण्याचे प्रमाण दुपटीने वाढते.
– पुरेशी झोप व अनुलोम, विलोम योगा
– व्हिटॅमिन युक्त आहार घेणे सलाड व फळे.
– सकाळी दुधीभोपळा रस व 2चमचे जवस पावडर दिवसातून 3वेळेस खाणे.
– आमलकी, सर्पगंधा, अर्जुन, दालचिनी, अकिक पिष्टी, संगेवशव पिष्टी, जहरमोहरा पिष्टी कोमट पाण्यातून, दिवसातून 2वेळा घेतल्यास निश्चित पणे हृदय रोग बरा होतो.

डॉ. ओंकार निंगनुरे मोबा. -9175723404

Spread the love
error: Content is protected !!