मातोश्री बाल विद्यालय पुलाची शिरोली शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषक वितरण सोहळा संपन्न

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथील मातोश्री बाल विद्यालय या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न मोठ्या उत्साहात झाला.हा कार्यक्रम रविवारी राष्ट्रसेवा प्रशालाच्याा प्रागणात उत्साहात संपन्न झाला. पुलाची शिरोली येथील मातोश्री बाल विद्यालय या शाळेचे विविध गुणदर्शन व पारितोषिक वितरण सोहळा राष्ट्रसेवा प्रशालेच्या प्रागनात नुकताच पार पडला.या संमेलनामध्ये देशभक्तीपर गीते, कोळीगीते,विनोदी नाटक,लावणी, बालगीते,या विषयावर कार्यक्रम सादर करण्यात आला
या कार्यक्रमात विविध शैक्षणिक,क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.मातोश्री बाल विद्यालय ही शाळा गेली १४  वर्ष ज्ञानदानाचे कार्य करत आहे.या शाळेमध्ये शिकून आपल्या शिक्षणाचा पाया मजबूत केलेले अनेक विद्यार्थी आज उच्च पदावर ती कार्यरत आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजीराव  सातपुते राष्ट्रसेवा प्रशालेचे चेअरमन हे होते.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपसरपंच बाजीराव पाटील, नागाव मुख्याध्यापक अनिल पाटील, पत्रकार कुबेर हंकारे,उद्योजक गणेश खवरे, उद्योजिका सौ.अस्मिता दिघ,संस्थापक सूर्यकांत धनावडे,वैष्णवी धनावडे,उद्योजिका सौ.ज्योती शिंदे, सौ.कल्याणी शिंदे यांची प्रमुख उपस्थित होती.या सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष बाजीराव सातपुते व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे शाळेचे मुख्याध्यापक सुनील चौधरी यांनी स्वागत व सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाजीराव सातपुते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण असतो या माध्यमातून त्यांच्या कलागुणांचा गौरव शाळेचे वार्षिकनेस संमेलन म्हणजे विद्यार्थ्यांसाठी काचे व्यासपीठ मिळते.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाला व कौशल्याला वाव मिळतो नेतृत्व गुण केवळ राजकीय क्षेत्रात उपयोगी पडतात असे नाही,तर व्यवसायिक शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचा चांगला उपयोग होतो असे म्हणाले व त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.या समारंभात प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व ट्रॉफी देण्यात आल्या.तसेच,विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनिता देवकर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे अध्यक्ष सुनील चौधरी सर,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष योगदान लाभले.

आभार धनावडे सर यांनी मानले.वंदे मातरम या राष्ट्रगीता नंतर कार्यक्रमाची सांगता झाल्याचे जाहीर करण्यात आले.शेवटी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना सतत प्रयत्नशील राहण्याचा संदेश दिला.

Spread the love
error: Content is protected !!