कुरुंदवाड / प्रतिनिधी
गेले 50 वर्षाहून अधिक काळ सहकार बँकिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या येथील दि गणेश सहकारी बँकेस 2023 चा बँको ब्ल्यू रिबन सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार देऊन नुकतेच गौरवण्यात आले.लोणावळा येथे एका विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार बँकेत प्रदान करण्यात आला
रिझर्व बँक ऑफ इंडियाचे माजी चीफ जनरल मॅनेजर भार्गवेश्वर बॅनर्जी बँको ब्ल्यू रिबनचे अध्यक्ष अविनाश शिंत्रे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रधान करण्यात आला हा पुरस्कार दि गणेश सहकारी बँकेचे चेअरमन सदाशिव जोशी यांनी स्वीकारला.यावेळी संचालक बाळासाहेब दिवटे,दिगंबर शंकर पुजारी,डॉ नितीन घोरपडे,यशराज जोशी,मंदार धर्माधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी नीता खलाटे,ऑफिसर महेश परीट आदी उपस्थित होते. देशभरातील 100 बँकांमधून या पुरस्कारासाठी दि गणेश सहकारी दर्जाची निवड करण्यात आली होती.या पुरस्काराबाबत बोलताना चेअरमन सदाशिव जोशी म्हणाले गेल्या पाच दशकापासून शेतकरी व सर्वसामान्य ग्राहक व त्यांची हित जपत केलेल्या पारदर्शक कारभारामुळे या पुरस्कारासाठी आमच्या बँकेची निवड झाली ही अत्यंत आनंदाची गोष्ट असून राज्यभरात आता आमच्या बँकेचे नाव उज्वल झाले आहे.यासाठी सर्व संचालक तसेच कर्मचारी वर्ग सभासद ज्यांनी केलेल्या कामाची ही पोहच पावती आहे असे त्यांनी नमूद केले.
यावेळी व्हाईस चेअरमन रामचंद्र मोहिते,संचालक दत्तात्रय सुतार,प्रभू चौगुले,चिन्मय कागलकर, अरविंद जोशी, बापू जोंग, नेमांना ऐनापुरे, श्रीवल्लभ जेरे पुजारी, जयवंत कांबळे,सी.ए.मनोहर जोशी,त्रिशाला चौगुले, रेखा पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते.