निमशिरगावमध्ये दूषित पाणीप्रश्नावर गटविकास अधिकाऱ्याकडून झाडाझडती; ग्रामपंचायतीला खडे बोल

निमशिरगाव / प्रतिनिधी निमशिरगावमध्ये दूषित व अळीयुक्त पाणीपुरवठ्याच्या गंभीर प्रश्नावर अखेर प्रशासनाला जाग आली असून शिरोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी गावाला भेट देत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली.नागरिकांच्या तीव्र संतापानंतर आणि माध्यमांतून वारंवार बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी गावात धाव घेत ग्रामपंचायत प्रशासनाला कडक शब्दांत जाब विचारला.गावातील अनेक भागांमध्ये गटारीमिश्रित व अळीयुक्त पाणी नळांमधून … Read more

दूधगंगा उगम पाणीपुरवठा योजनेतील त्रुटींवरून संताप; “आता आरपारची लढाई” – कॉम्रेड आप्पा पाटील यांचा इशारा

अब्दुल लाट / प्रतिनिधी  अब्दुल लाट दूधगंगा नदी उगम पाणीपुरवठा योजनेत कथितपणे चुकीच्या पद्धतीने झालेल्या कामकाजाविरोधात गावकऱ्यांचा आवाज अधिक तीव्र होत असून या प्रकरणावर कॉम्रेड आप्पा पाटील यांनी कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना काळ माफ करणार नाही,असा इशारा देत त्यांनी आता आरपारची लढाई लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.कॉम्रेड … Read more

सांगलीच्या रंगभूमीवर ‘हालगी’ चा दमदार नाद; राजेंद्र प्रधान यांच्या एकपात्री लोकनाट्याचा रविवारी शुभारंभ

शिरोळ / प्रतिनिधी  मराठी रंगभूमीवर एकपात्री प्रयोगांची परंपरा जपणाऱ्या कलाकारांमध्ये शिरोळ येथील प्रसिद्ध नाट्यकलाकार राजेंद्र प्रधान यांचे नाव विशेष आदराने घेतले जाते.गेल्या तीन दशकांहून अधिक काळ एकपात्री नाट्यप्रयोगांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील रसिकांना खळखळून हसवले, विचार करायला भाग पाडले आणि लोकजीवनातील विविध पैलू रंगमंचावर जिवंत केले.आता त्यांच्या नव्या एकपात्री लोकनाट्य प्रयोगाचा, ‘हालगी’चा, शुभारंभ रविवारी १५ मार्च … Read more

शिरोळ येथे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

शिरोळ / प्रतिनिधी  अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त शिरोळ शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविक भक्तांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.शहरातील अनेक स्वामी भक्तांनी महाप्रसादाचे आयोजन करून प्रगट दिन भक्तिभावाने साजरा करण्याची तयारी केली आहे.याच पार्श्वभूमीवर शिरोळ येथील पत्रकार बाळासाहेब माळी यांच्या सोमेश्वर निवासस्थानी २० मार्च रोजी … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलवरील दोघे गंभीर जखमी

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे  पुणे–बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सांगली फाटा परिसरात अज्ञात वाहनाने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने मोटारसायकलवरील दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. जखमींना तात्काळ कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सुमारे सहा वाजून … Read more

पाणीपुरवठा योजनेवरून अब्दुल लाटमध्ये संताप; १६ मार्चपासून आमरण उपोषणाचा इशारा

अब्दुल लाट / प्रतिनिधी गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाबाबत ग्रामपंचायत व प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने अब्दुल लाट येथील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.याच पार्श्वभूमीवर सोमवार, १६ मार्चपासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय कॉम्रेड आप्पा पाटील यांनी जाहीर केला आहे.गावातील सुजान व जागरूक नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासावर आणि पाठबळावर आपण या प्रश्नासाठी … Read more

पुलाची शिरोलीत तब्बल ४५ दिवसांनंतर घरगुती गॅस सिलिंडर मिळणार असल्याने गॅसधारकांमध्ये असंतोषाचे वातावरण

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे  इराण आणि इज्राईल – अमेरिका युद्ध सुरू आहे.त्यामुळे आखाती देशांमधून होणारा गॅस पुरवठा थांबला आहे.त्यामुळे देशात गॅस संकट निर्माण झाले आहे.त्या कारणांमुळे पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथे घरगुती गॅस सिलिंडर तब्बल ४५ दिवसांनंतर वितरण करण्याचा नियम प्रशासनाने लागू केला आहे.त्यामुळे गॅसधारकांमध्ये तीव्र नाराजी व असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. … Read more

शिरोली पुलाची येथील मदरसा जवळील वळणावर कार सिमेंटच्या बॅरिकेडवर जोरात आदळून कार आडकून राहीली

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे  पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली पुलाची येथील मदरसा जवळील वळण वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा बनत चालले आहे. या धोकादायक वळणावर गुरुवारी पहाटे तिन वाजण्यासुमार स्विफ्ट डिझायर कार सिमेंटच्या बॅरिकेडवर जोरात आदळली. हा अपघात इतका भीषण होता की टनाचे बॅरिकेट १० फूट लांब सरकून कार बॅरिकेडवरच आडकुन पडली. या अपघातात गाडीचे मोठ्या … Read more

इंदापूरच्या साखर संचालकांचा “श्री दत्त पॅटर्न”चा अभ्यास दौरा

शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि क्षारपड मुक्ती यशस्वी शिरोळ / प्रतिनिधी  श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर,इंदापूरच्या सर्व संचालक आणि शेती अधिकाऱ्यांनी शेतकरी हितासाठी आणि नवीन तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी श्री दत्त साखर कारखाना कार्यस्थळाला अभ्यास दौरा केला.या दौऱ्यात संचालकांनी कारखान्याच्या विविध उपक्रमांचे निरीक्षण करून त्यांच्या यशोगाथेबद्दल माहिती घेतली आणि भविष्यातील शेतीसंबंधी धोरणांसाठी मार्गदर्शन मिळवले.  [ … Read more

दत्त साखर कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची 406 कोटींची बिले एकरकमी, विनाकपात अदा

शिरोळ / प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरलेला शिरोळ येथील श्री दत्त साखर कारखाना यंदाच्या गळीत हंगामातही शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे.कारखान्याने हंगामात गाळपासाठी उपलब्ध झालेल्या संपूर्ण उसाची बिले एकरकमी व कोणतीही कपात न करता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहेत.यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा उद्यान पंडित … Read more