बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल…! शिरोळहून चैत्र वारीसाठी पायी दिंडीचे उत्साहात प्रस्थान

शिरोळ / प्रतिनिधी “बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, राम कृष्ण हरी…” या अखंड जयघोषात, टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात शिरोळ येथून चैत्र वारीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या पायी दिंडीचे रविवारी सकाळी उत्साहात प्रस्थान झाले. संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले असून वारकऱ्यांच्या या पवित्र सोहळ्याने शिरोळ नगरीत आध्यात्मिक उर्जा संचारली.चैत्र वारीच्या निमित्ताने गेल्या अकरा … Read more

शिरोळमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी; सामूहिक नमाजाने दिला शांततेचा संदेश

शिरोळ / प्रतिनिधी  शिरोळ व परिसरातील मुस्लिम बांधवांनी पवित्र रमजान ईद मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी केली.शनिवारी सकाळी शिरोळ येथील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठणासाठी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र जमले होते.पवित्र वातावरणात नमाज अदा करताना जागतिक शांतता, देशाची एकता व अखंडता तसेच समाजातील जातीय सलोखा कायम राहावा यासाठी विशेष दुवा पठण करण्यात आले.नमाज पूर्ण … Read more

२० वर्षांपासून शिरोळच्या यादव परिवाराकडून वारकरी दिंडीची सेवा; भक्तीभावाने पार पडला मुक्काम

शिरोळ / प्रतिनिधी चैत्र वारीच्या पवित्र निमित्ताने पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या पायी दिंडीचे शिरोळ येथे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले.येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन यादव व त्यांच्या परिवाराने वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुढाकार घेत भक्तीभावाचे दर्शन घडविले.कर्नाटक राज्यातील ममदापूर येथून दरवर्षीप्रमाणे यंदाही वारकऱ्यांची दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली असून शिरोळ येथे त्यांचा मुक्काम करण्यात आला.गेल्या वीस वर्षांपासून मोहन यादव हे आपल्या … Read more

शिरोळ नगरपरिषदेत इंजिनिअर्स-आर्किटेक्ट्सची महत्वपूर्ण बैठक; घरकुल योजना व बांधकाम प्रक्रियेला गती देण्याचा निर्धार

शिरोळ / प्रतिनिधी  शिरोळ नगरपरिषद येथे असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स अँड आर्किटेक्ट्स, शिरोळ यांची एक महत्वपूर्ण बैठक शुक्रवार दि.२० मार्च रोजी सकाळी १० वाजता उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.शहराच्या विकासाशी निगडित बांधकाम परवाना प्रक्रिया तसेच विविध घरकुल योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली.बैठकीच्या प्रारंभी उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून बैठकीचा उद्देश स्पष्ट करत … Read more

रोटरी क्लब ऑफ होरायझन, कोल्हापूर यांच्या वतीने कन्या विद्या मंदिर, शिरोली नं.१ येथे बेंच प्रदान उपक्रम

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे  रोटरी क्लब ऑफ होरायझन यांच्यातर्फे कन्या वि.मं.शिरोली नं 1 शाळेस सुमारे 60 हजार रु किमतीचे १५ बेंच प्रदान करण्यात आले. हे बेंच स्मॅकचे अध्यक्ष तसेच उद्योजक रो. राजाराम पाटील, उद्योजक रो. नरेश पांचाळ आणि सी.ए. श्री. राकेश मुथा यांच्या देणगीतून उपलब्ध झाले.रो. राजाराम पाटील, रो. नरेश पांचाळ व ग्रामपंचायत … Read more

पुलाची शिरोली परिसरात विजांच्या कडकडाट आणि गारपिटीसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे शिरोली पुलाची, नागाव, मौजे वडगाव , शिये , हालोंडी आणि हेरले परिसरात बुधवारी दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह आणि गारपिटीसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे ऐन काढणीला आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे.गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यांनंतर आलेल्या या … Read more

टोप येथे कडबा गोळा करते वेळी सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे  टोप (ता. हातकणंगले) येथील भोसले खडी मळ्यात सर्पदंश झाल्याने एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुनीता सर्जेराव भोसले (वय ५५) असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता भोसले या आज बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेतीकामासाठी बिरदेव मंदीरामागे असणाऱ्या भोसले खडी मळ्यातील आपल्या शेतात … Read more

पुलाची शिरोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला PRC केरळ पथकाची भेट; कामकाजाबाबत समाधान व्यक्त

पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे  पुलाची शिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राला आज दिनांक १८ मार्च २०२६ रोजी पॉप्युलेशन रिसर्च सेंटर (PRC), केरळ येथील अनिल कुमार आणि श्रीमती अनघा कुमार यांनी भेट देऊन आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला. या भेटीदरम्यान केंद्रातील विविध कामकाज, HMIS (Health Management Information System) पोर्टलवरील नोंदी, तसेच रुग्णसेवेशी संबंधित सर्व … Read more

पुलाची शिरोली एमआयडीसीत भट्टीचा भीषण स्फोट; कामगाराचा जागीच मृत्यू  

पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे  पुलाची शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये मंगळवारी रात्री एका कंपनीत हिट ट्रीटमेंट भट्टीचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत इंग्रुळ (ता. शिराळा) येथील एका ३८ वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की संपूर्ण परिसर हादरून गेला. राहुल मुकुंद कांबळे (वय ३८, रा. … Read more

शिरोलीत गावठी पिस्तुलासह तरुणाला अटक; ३० हजारांचा मुद्देमाल जप्त

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे  बेकायदेशीररित्या गावठी बनावटीचे पिस्तुल बाळगणाऱ्या तरुणाला शिरोली एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून सुमारे ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १७ मार्च २०२६ रोजी रात्री उशिरा करण्यात आली.याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ८८/२०२६ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम … Read more