जयसिंगपूरात शनिवारी ‘महामानवांची गौरवगाथा’ प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम

शिरोळ / प्रतिनिधी जयसिंगपूर येथे येत्या शनिवारी (दि. २८ मार्च) एक प्रेरणादायी सांस्कृतिक मेजवानी रंगणार असून ‘महामानवांची गौरवगाथा’ या संगीतमय प्रबोधनात्मक गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सहकारमहर्षी स्व.शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहात सायंकाळी ठीक ४ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भगवान महावीर,महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले,राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब … Read more

शिरोली पुलाची ग्रामपंचायतीच्या घंटागाडीतून कोंबडीचे टाकाऊ मांस रस्त्यावर पडल्याने परिसरात दुर्गंधी

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे  शिरोली पुलाची ता हातकणंगले येथील ग्रामपंचायतीच्या घंटागाडीतून घनकचरा व चिकन दुकानातील टाकाऊ मांस (वेस्ट) वाहून नेत असताना, चालकाच्या हलगर्जीपणामुळे हे मांस भररस्त्यात पडल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली आहे. शिरोली औद्योगिक वसाहतीमधील जाफराणी वजन काट्याजवळ ही घटना असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. या प्रकारामुळे उद्योजक आणि ग्रामस्थांमधून तीव्र … Read more

शिरोली एमआयडीसीतील ऑईल डेपोला भीषण आग; सहा लाखांचे नुकसान

पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे  पुलाची शिरोली येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या एमआयडीसी परिसरात कमल ट्रेडर्स या ऑईल डेपोला लागलेल्या भीषण आगीमुळे सुमारे सहा लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. या घटनेमुळे परिसरात काही काळ मोठी खळबळ उडाली होती. मात्र प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे स्थानिकांनी सांगितले.मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर एक्सेलच्या पाठीमागील बाजूस असलेल्या कमल ट्रेडर्स या … Read more

पुलाची शिरोली सांगली फाटा येथील पेट्रोल पंम्पावर पेट्रोल टाकण्यासाठी वाहनधारकांची लांबच लांब रांगा

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धसदृश परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या संकटाचा फटका आता स्थानिक स्तरावर बसू लागला आहे. इंधन टंचाईच्या भीतीपोटी मंगळवार दुपारपासून पुलाची शिरोली सांगली फाटा परिसरातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी प्रचंड गर्दी केली. अनेक ठिकाणी पेट्रोल आणि सीएनजीचा पुरवठा बंद झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली असून पुणे-बेंगलोर … Read more

शेडशाळ येथे महिलांसाठी उद्योजकतेचा नवा दीप: मशरूम उत्पादन प्रशिक्षणातून स्वावलंबनाचा मार्ग उजळला

शिरोळ / प्रतिनिधी  ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने शेडशाळ (ता. शिरोळ) येथे आयोजित करण्यात आलेल्या उद्योजकता विकास कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित, पुणे आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या एकदिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाने महिलांमध्ये नवउद्योजकतेची उमेद निर्माण केली. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यानपंडित गणपतराव … Read more

शिरोळ नगरपरिषदेच्या वतीने मा खा राजू शेट्टी यांचा सत्कार; भगतसिंह पुरस्काराने चळवळीला नवी प्रेरणा

शिरोळ / प्रतिनिधी  पुणे येथे कृष्णा पब्लिकेशन व सरहद संस्थेतर्फे प्रदान करण्यात आलेल्या ‘युगद्रष्टा शहीद भगतसिंह पुरस्काराने’ सन्मानित झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांचा शिरोळ नगर परिषदेतर्फे नागरी सत्कार करण्यात आला. शहीद भगतसिंह यांचे पुतणे ज्येष्ठ विचारवंत किरणजीत सिंह यांच्या हस्ते हा पुरस्कार शेट्टी यांना प्रदान करण्यात आला होता.शिरोळ नगर … Read more

शिरोळ पालिकेच्या सभेत जनहिताचे महत्त्वपूर्ण निर्णय : निर्बिजीकरण मोहीम, मोफत पाणी टँकर आणि दिव्यांगांसाठी ५% निधी

शिरोळ / प्रतिनिधी शिरोळ नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विविध जनहिताच्या निर्णयांना मंजुरी देण्यात आली.भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण, मयत व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी मोफत पाणी टँकर, तसेच दिव्यांगांसाठी ५ टक्के निधी देण्याचे निर्णय एकमताने मंजूर झाले; मात्र या निर्णयांच्या अंमलबजावणीवर आणि अधिकार केंद्रीकरणावर अप्रत्यक्षपणे राजकीय चर्चा रंगल्याचे चित्र पाहायला मिळाले. कै.दिनकरराव यादव सभागृहात नगराध्यक्षा योगिता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ही … Read more

अफवांमुळे पेट्रोल पंपांवर गर्दी; युसुफ पेट्रोलियमची ग्राहकांसाठी स्तुत्य सुविधा

शिरोळ / प्रतिनिधी  आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेल दरवाढ किंवा पुरवठा खंडित होण्याच्या अफवांनी शिरोळ शहरात एकच खळबळ उडवली.या अफवांमुळे आज शहरातील विविध पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी मोठी गर्दी केली. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे काही ठिकाणी वाहनधारक आणि पंप कर्मचाऱ्यांमध्ये किरकोळ शाब्दिक वादही झाल्याची माहिती समोर आली आहे.नेहमीप्रमाणे 100 ते 200 रुपयांचे पेट्रोल भरणारे अनेक … Read more

शिरोली पुलाची येथील पिर दर्गा परिसरात वयोवृद्धाची आजारपणास कंटाळून आत्महत्या 

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे  शिरोली पुलाची येथील पिर दर्गा परिसरात वयोवृद्धाची आजारपणास कंटाळून आत्महत्या शिरोली पुलाची ता हातकणंगले येथील विट्ट भट्टी परिसरात असणाऱ्या पिर दर्ग्याच्या मागील बाजूस पट्टणकोडोली येथील ६५ वर्षीय वयोवृद्धाने आजारपणास कंटाळून गळफास लावून घेवून आत्महत्या केली.ही घटणा आज रविवारी सकाळी उघडकीस आली .मयत वयोवृद्धाचे नाव रामचंद्र राघू गावडे ( वय … Read more

ग्रामीण मातीतून जागतिक भरारी: उद्योजक आण्णासाहेब चकोते यांना “राष्ट्रीय उत्कृष्ट उद्योजक प्रेरणा अवार्डने” सन्मानित 

मुंबई / प्रतिनिधी  एखाद्या व्यक्तीचा यशस्वी प्रवास हा केवळ वैयक्तिक उपलब्धीपुरता मर्यादित राहत नाही,तर तो समाजासाठी प्रेरणादायी ठरतो.जिद्द, मेहनत, दूरदृष्टी आणि सामाजिक बांधिलकी यांच्या बळावर उभा राहिलेला उद्योगप्रवास जेव्हा राष्ट्रीय स्तरावर गौरवला जातो, तेव्हा त्या सन्मानाला विशेष महत्त्व प्राप्त होते. अशाच एका प्रेरणादायी कार्याची दखल घेत चेंबर ऑफ अँडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँड मिडियम बिझनेस (CASMB), … Read more