दत्तवाडात सापडला अत्यंत विषारी पोळा जातीचा दुर्मिळ साप

दत्तवाड / प्रतिनिधी दत्तवाड ता.शिरोळ येथे अत्यंत विषारी व दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या पोळा जातीचा साप अमोल कोळी यांच्या घरासमोर आढळून आला.दत्तवाड येथील सर्पमित्र संतोष पाटील यांनी अत्यंत शिताफीने पकडून वन विभागाकडे सुपुर्द केला.सर्पमित्र संतोष पाटील,सोहेल गवंडी,मोहन सुतार यांनी सर्पाबद्दलचे गैरसमज दूर करून शेकडो सर्पांना जीवदान दिलेले आहेत. त्यांच्या कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कलाविश्वरंग रंगभूमी संस्थेचे कार्य कौतुकास्पद : अनिलकुमार हेळकर

कलाविश्‍व रंगभूमीतर्फे आदर्शवत व्यक्तींना पुरस्कार प्रदान शिरोळ / प्रतिनिधी सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात कलाविश्व रंगभूमी संस्थेचे काम कौतुकास्पद आहे.या संस्थेच्या प्रेरणादायी प्रोत्साहनामुळे अनेक कलाकारांना संधी मिळाली आहे.त्यामुळे कला संस्था व कलाकार यांच्या विषयी अभिमान वाटतो.समाज मनाला आनंद देणारा कलाकार असतो.कलाकारामुळे समाजाला परिवर्तनाची दिशा मिळत असते.यापुढेही कलाकारांनी लोकप्रबोधनाच्या चळवळी बरोबरच सांस्कृतिक क्षेत्रात निरंतर कार्य सुरु ठेवून … Read more

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील २४ हजार लाभार्थ्यांना स्वखर्चातून आयुष्मान भारत कार्ड देणार – मा.आ.अमल महाडिक

कुंभोज : विनोद शिंगे सर्वसामान्य गोरगरिबांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजना आणली आहे.या अंतर्गत पाच लाखांपर्यंत मोफत उपचार होणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान भारत कार्ड असणे आवश्यक आहे.सर्वसामान्य लोकांना घरबसल्या आयुष्मान भारत कार्ड मिळावे या हेतूने माजी आमदार अमल महाडिक यांनी स्वखर्चातून हे कार्ड्स वितरित करण्याचा … Read more

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर अंगणवाडी सेविकांचा थाळी नाद

कोल्हापूर / प्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना २६ हजार रुपये आणि मदतीसांना वीस हजार रुपये दरमहा मानधन मिळावं या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने आजपासून बेमुदत संप पुकारलेला आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आणि जोरदार घोषणाबाजी करत थाळीनाद आंदोलन केलं आहे.राज्यभरातील सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस … Read more

श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरुसास उत्साहात प्रारंभ

श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरुसास उत्साहात प्रारंभ रांगोळी कॅरम व्हाँलीबॉल मोटरसायकलबरोबर म्हैस व रेडकू पळविण्याच्या स्पर्धा संपन्न शिरोळ / प्रतिनिधी श्री बुवाफन महाराज की जय श्री बुवाफन महाराज की दोस्तारो धिनच्या जयघोषात सकाळी श्री बुवाफन महाराज मंदिरात समाधीस्थळास महाअभिषेक घालून व पूजा करण्यात आली आणि रात्री समाधीस्थळास गंध लावून मानाचा गलिफ … Read more

दत्त इंडियाने दुसरा हप्ता १०० आणि चालूला पहिली उचल ३१००/ जाहीर करावी

अन्यथा वाहतूक रोखून धरू आंदोलन अंकुशचा इशारा सांगली / प्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकरी संघटना आणि कारखान्यांच्या मध्ये झालेल्या निर्णयाप्रमाणे मागील ऊसाला दुसरा हप्ता १००/ रुपये व चालूला किमान ३१००/ पहिली उचल द्यावी अशा मागणीचे निवेदन आज आंदोलन अंकुशच्या वतीने दत्त इंडिया सांगली व्यवस्थापनास देण्यात आले.सदरचे निवेदन शरद उर्फ बापू मोरे यांनी स्वीकारले.दिलेल्या निवेदनात म्हटले की … Read more

अतिक्रमणे नियमित करून नावे नोंद करा मा.आम.डॉ.सुजित मिणचेकर

कुंभोज / प्रतिनिधी विनोद शिंगे संपूर्ण महाराष्ट्रातील गायरणामधील अतिक्रमण धारकांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनिक्रमने काढण्याबाबत नोटीसा लागू करण्यात आलेल्या आहेत.परंतु असे झाल्यास संबंधित अतिक्रमणे धारक कुटुंबावर बेघर होऊन निवारा अभावी उघड्यावर राहण्याची नामुष्की येणार आहे.त्यामुळे सन 2002, 2004 व 2011 च्या शासनाच्या निर्णयानुसार गायरणामधील अतिक्रमणे नियमित करून संबधिताची नावे सातबारा किंवा मिळकत पत्रकी लावण्यात यावी … Read more

साखर कारखानदार शेतकऱ्याला दर द्यावा लागतो म्हणून एकत्र येतात – खा.शेट्टी

कुरूंदवाड / प्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे साखर कारखानदारांचे हाडवैर असताना फक्त ऊस उत्पादक शेतकऱ्याला दर द्यावा लागतो म्हणून ते एकत्र येतात.मात्र आता शेतकऱ्यांनी ही एकसंघ होऊन या कारखानदारांचा हिशोब चुकता केला पाहिजे. असे आवाहन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.येथील ओंकार चौक येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आयोजित आभार सभेत माजी खास.शेट्टी … Read more

दत्तवाड येथे भाजप कार्यकर्त्यांचे साखर पेढे वाटून आनंद उत्सव

शिरोळ / प्रतिनिधी मध्य प्रदेश,राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यात भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल दत्तवाड येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत साखर व पेढे वाटून आनंदोउत्सव साजरा केला.मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन करून आपला विजय मिळवला आहे.येथील गांधी चौक,दसरा चौक आदी ठिकाणी … Read more