कुरुंदवाड येथे लिंगायत समाज बहुउद्देशीय हाॅलसाठी निधी

कुरुंदवाड /प्रतिनिधी कुरुंदवाड येथे लिंगायत समाजासाठी गट नंबर १२७ मध्ये खासदार धैर्यशील माने यांच्या प्रयत्नातून पालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून लिंगायत समाज बहुउद्देशीय हाॅलसाठी निधी प्राप्त झाला असून या हाॅलचा भूमिपूजन व पायाभरणी दि.१० डिसेंबर रोजी खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.या सोहळ्यास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार विनय कोरे,माजी आमदार सुरेश हाळवणकर,पंचगंगा साखर कारखाण्याचे … Read more

बांबवडेचा उदय साखर कारखाना देणार ३२००/ पहिली उचल

शाहूवाडी / प्रतिनिधी अथणी शुगर युनिट २ च्या बांबवडे येथील उदय साखर कारखान्याने गत हंगामातील गळीत उसाचे प्रतिटन १०० रुपये तसेच चालू गळीत हंगामासाठी एफआरपी अधिक १०० रुपये प्रमाणे ऊसदर त्वरित जाहीर करावा,अन्यथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कारखान्यावर बेमुदत वजनकाटा बंद आंदोलन करण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने इशारा दिला होता.त्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाली करीत … Read more

‘या’ राशीचे लोक खूप भाग्यवान, 7 डिसेंबर पहा तुमचे आजच राशी भविष्य

मेष – आजचा तुमच्यासाठी शुभ दिवस,सर्व नियोजित कामे यशस्वी होणार.तुम्हचा कर्तृत्ववाने ऑफिसच्या कामात तुम्हाला विशेष मान-सन्मान मिळणार. वृषभ – आज कामानिमित्त प्रवास घडेल, आजच्या दिवसात कोणताही मंदिरात जा मानसिक समाधान मिळेल.ऑफिस मध्ये वरिष्ठांकडून कौतुक होईल.कुटुंबात आनंदाचे वातावरणामुळे सगळ्यांची साथ मिळेल. मिथुन – आज तुमच्या आवडीचे काम कराल, तुम्हाला आवडीच्या गोष्टीत संधी मिळेल.नवीन योजना येतील त्यावर … Read more

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक हजरत नूरखान बादशाह उरूस

शिरोळ / प्रतिनिधी शिरोळ येथील ग्रामदैवत हजरत नुरखान बादशाह उरूस अमाप उत्साहात प्रत्येकवर्षी साजरा केला जातो.बुवाफन महाराज उत्सवाबरोबरच हजरत नुरखान बादशाह उरूस सर्व धर्मियांचे लोक श्रध्देने साजारा करतात.उत्सव आणि उरूसानिमित्त सोमवार ते शुक्रवार या चार दिवसांच्या कालावधीत धार्मिक कार्यक्रमासह विविध स्पर्धा,शर्यती आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.जागृत देवस्थान असलेले हजरत नुरखान बादशाह दर्गाह येथे दर्शनासाठी … Read more

‘या’ सदस्यांच्या खातेनिहाय कारभाराच्या चौकशीसाठी ठिय्या आंदोलन

नृसिंहवाडी / प्रतिनिधी नृसिंहवाडी येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर विद्यमान पदाधिकाऱ्यांनी मनमानी कारभार करून कायद्यांचे उल्लंघन केले आहे.वरिष्ठांच्या आदेशांचे पालन न करता ग्रामसेवक गैर कारभाराला खत पाणी घालत आहेत असा आरोप करत गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आज मंडप टाकून ठिया आंदोलन केले.ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांची सत्तारूढ सदस्यांची चौकशी व्हावी अशी मागणी ही यावेळी काही प्रमुख नेते मंडळींनी केली आहे.आज … Read more

शिरोळ पोलिसांनी केली रेकॉर्डवरील सराईत चोरट्यास अटक

शिरोळ / प्रतिनिधी शिरोळ येथे सुरू असलेल्या उरुसाच्या पार्श्वभूमीवर रात्री पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना बुवाफन मंदिराच्या परिसरात गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास शिरोळ पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली.इंद्रजीत मोहन गुरव (वय,३२ रा. कोंढवे, ता.सातारा, जि. सातारा) याला बुधवारी मध्यरात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली. संशयित आरोपी गुरव याच्यावर सातारा, बारामती,व … Read more

महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरुसानिमित्त स्केटिंग व श्वान पळविणे स्पर्धा उत्साहात,स्केटिंग स्पर्धेत रोहन माळी व पियुष मेहेतर प्रथम तर श्वान स्पर्धेत अण्णाप्रेमीचा ईगल श्वान प्रथम

श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरुसानिमित्त स्केटिंग व श्वान पळविणे स्पर्धा उत्साहात स्केटिंग स्पर्धेत रोहन माळी व पियुष मेहेतर प्रथम तर श्वान स्पर्धेत अण्णाप्रेमीचा ईगल श्वान प्रथम शिरोळ / प्रतिनिधी शिरोळचे ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरुसानिमित्त बुधवारी खुलागट आणि इनलाईन स्केटिंग तसेच गाडी मागून श्वान पळविणे स्पर्धा … Read more

आंदोलन अंकुशच्या रेट्याने मिळणार कर्नाटकात ३१००/ ऊस दर

आंदोलन अंकुश संघटनेच्या ऊस लढ्यास यश आंदोलन अंकुश संघटने कडून गेल्या आठवड्यात महाराष्ट्र सीमेवर असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी चालू वर्षी येणाऱ्या उसात ३१००/ रुपये दर द्यावा अन्यथा ऊस वाहतूक रोखणार अशा आशयाचे निवेदन देऊन सर्व कारखान्याच्या प्रशासनाशी चर्चा केली होती.त्याअनुशगांने आज प्रथम वेंकटेश्वरा पावर प्रोजेक्ट बेडकीहाळ या कारखान्याच्या प्रशासनाने तशी मागणी मान्य करून पत्र … Read more