पूरग्रस्त कृती समीतीच्या वतीने पंचगंगा नदी पुलाशेजारील लाक्षणिक उपोषण

पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे पंचगंगा पुलाशेजारील महामार्गाचे भराव टाकून चाललेले रुंदीकरण थांबवून पिलर कमानीचे स्ट्रक्चर करून रुंदीकरण काम सुरु करावे , जिल्ह्यातील पूररेषेतील सर्व रस्त्यांवर फक्त भराव न टाकता शास्त्रीय आवश्यकतेनुसार पिलर कमानीचे स्ट्रक्चर व मोऱ्या बांधकाम सुरु करावे. या मागण्यांसाठी पूरग्रस्त समिती कोल्हापूरच्या वतीने शिरोली पुलाची येथील पंचागंगा नदी दर्ग्याशेजारी लाक्षणिक उपोषण करण्यात … Read more

सदलगा-दत्तवाड पुल असून अडचण नसून खोळांबा

सदलगा / प्रतिनिधी अण्णासाहेब कदम कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागात आंतरराज्य वाहतूक वाढावी ,लोकांना प्रवासासाठी अनुकूल व्हावे,या उद्देशाने चिकोडी- शिरोळ या दोन तालुक्यांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दत्तवाड पूल अनेक वर्षां पूर्वी बांधून पूर्ण झाला असून, तो सध्या असून अडचण नसून खोळांबा या स्थितीत आहे.कोट्यावधी रुपये खर्च करून आंतरराज्य वाहतूक वाढावी लोकांचे येणे जाणे वाढावे,व्यापार वाढावा,महाराष्ट्र व … Read more

जायंटस् फेडरेशन २ ची वार्षिक कॉन्फरन्स उत्साहात

शिरोळ प्रतिनिधी चंद्रकांत भाट जायंटस् फेडरेशन.२ क मधील युनिट क्रमांक १० ची दुसरी कॉन्फरन्स मौजे आगर हॉटेल मंजुश्री येथे उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.जायंटस् फेडरेशनचे युनिट डायरेक्टर सुधिर(भैय्या)कुलकर्णी यांनी घंटानाद करून कॉन्फरन्सची सुरवात केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पार्थना करण्यात आली.ओपनिंग रिमार्क डायरेक्टर सुधिर कुलकर्णी यांनी दिले जायंटस् फेडरेशन युनिट मधील जयसिंगपूर सिटी,शिरोळ सहेली,दुर्गा सहेली,सन्मती … Read more

नृसिंहवाडीचा आधारवड काळाच्या पडद्याआड – दर्शन वडेर

नृसिंहवाडी : दर्शन वडेर देऊन किनारा मनाच्या होडीचा सारंग हरवला, दीनांचा देव्हारा सोडून मोकळा श्रीरंग हरपला, घेऊन भरारी आभाळापल्याड पतंग सरकला..! दुःखाचे किती आणि कोणते शब्द व्यक्त करावेत,याची गणतीच मुळात मन विसरून गेले आहे.गुरुजींच्या निधनाची बातमी कळताच मनात अनाहुत भावनांचा कल्लोळ दाटून आलाय. समाजात सहजपणे,प्रेमाने वावरणारा माणूस जेव्हा अचानक निघून जातो तेव्हा सगळ्याच दिशा अंधाऱ्या … Read more

दानोळी परिसरात दुपती जनावरे चोरांचा धुमाकूळ, पशुपालकात भीतीचे वातावरण

जयसिंगपूर / प्रतिनिधी दानोळी ता.शिरोळ परिसरातील गावात दुपती जनावरे चोरी करणाऱ्या चोरट्यानी धुमाकूळ घातला आहे. शेतात,घराबाहेर बांधलेली जनावरे चोरीस गेल्या आहेत.याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करुन ही गाई सापडल्या नाहीत.यामुळे जनावरे चोरीला आळा घालण्यासाठी चोरीच गावातील मुख्य चौक व बाहेरील प्रमुख मार्गावर सी.सी कॅमेरे बसवण्याची मागणी पशुपालकांच्यातून होत आहे.दानोळी,कवठेसार,निमशिरगाव, कोथळीसह परिसरामधील पशुपालकांनी शेतीला जोडधंदा म्हणून कर्ज … Read more

थंडीत हातपाय दुखतात तर मग हा आयुर्वेदिक सल्ला पहायचं

आमवात (Rheumatoid Arthritis) आम म्हणजे विषारी पदार्थ.शरीरामध्ये विषारी पदार्थ साठत जातात व ते बोटांच्या पेरामध्ये,गुडघ्यामध्ये साठत जातात, विशेषतःलहान सांध्यांमध्ये सूज व वेदना वृश्चिक दंशवत वेदना असतात त्यालाच “आमवात “म्हणतात. कारणे – पचण्यास अतिजड पदार्थ सतत खाणे,नॉनव्हेज,दुधाचा व त्याचे पदार्थाचे अति सेवन,अयोग्य आहार विहार,अयोग्य दिनचर्या, जेवण झाल्या झाल्या लगेचच कष्टाची कामे करणे. तपासणी -RA – लक्षणे … Read more

आज तुमचं आजचे राशी भविष्य पाहिलं का ?

मेष – आज आर्थिक स्थिती चांगली राहील. आज प्रगतीचे नवीन मार्ग मिळतील, महत्त्वाच्या कामात लक्ष द्या, आज जोडीदाराचे सहकार्य मिळेल, वृषभ – आजचा दिवस आनंदात जाईल,नवीन आर्थिक लाभाची संधी मिळेल तुमच्याकडून सहकारी सल्लाही घेतील.आर्थिक स्थिती चांगली राहणार, नोकरदार मंडळींनी वरिष्ठांच्या दिलेल्या कामाकडे लक्ष द्या. मिथुन – आजचा दिवस खूप लाभदायक असेल. आज मेहनतीचे मिळेल.समाजात तुमचा … Read more

राजू शेट्टी यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे ‘ही’ मागणी

जयसिंगपूर / प्रतिनिधी केंद्र सरकारने इथेनॅाल वर बंदी घालण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे दुहेरी परिणाम आहेत.एकीकडे,इथेनॉल उत्पादनाच्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केलेल्या कारखानदार व शेतकऱ्यांवर आता कर्जाची परतफेड आणि इथेनॉल प्रक्रिया टिकवून ठेवण्याचे ओझे आहे.दुसरीकडे,निर्बंधामुळे इंधनासाठी इथेनॉल पुरवठ्यात अडथळा निर्माण होतो.ज्यामुळे साखर कारखान्यांचे संभाव्य आर्थिक नुकसान होते आणि सरकारच्या इथेनॉल मिश्रणाच्या उद्दिष्टामध्ये अडथळा निर्माण होणार असल्याने तातडीने ऊपाययोजना … Read more