पुलाची शिरोलीत रामनवमीचा उत्साह; भव्य शोभायात्रेने अवघं गाव झालं राममय!

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, गोरक्षक दल आणि सकल हिंदू समाज यांच्या संयुक्त विद्यमाने पुलाची शिरोली येथे रामनवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. विविध धार्मिक कार्यक्रम, भव्य शोभायात्रा आणि ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. उत्सवाच्या निमित्ताने सकाळी श्रीराम मंदिरात विधिवत अभिषेक, पूजन … Read more

पुलाची शिरोलीत सहा दुकान गाळे फोडून चोरट्यांनी एक लाखाचा मुद्देमाल केला लंपास 

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे  गुरुवारी मध्यरात्री पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत टोप हद्दीत शिरोली औद्योगिक वसाहतीतील आयडीबीआय बँकेशेजारी असणारे सहा दुकान गाळे फोडून चोरट्यांनी सुमारे एक लाखाचा मुद्देमाल लंपास केला.याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत टोप हद्दीत आयडीबीआय बॅंकेशेजारी दिनेश मिश्रा यांच्या मालकीचे लक्ष्मी टी स्टॉल,हेमंत मोरे यांच्या मालकीचे … Read more

पुलाची शिरोली येथील रणजीत श्रीपती बुडकर (हेरवाडे) वय वर्षे ३४ यांचे आकस्मिक निधन

पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे  वीस वर्षांपूर्वी श्रीपती बुडकर यांनी सुरू केलाला दूध विक्री व्यवसाय सध्या रणजीत सांभाळत होता. सन २०२१ मध्ये देशात आणि जगात कोरोनाचा प्रभाव वाढलेला असताना लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला होता.नात्या गोत्यातील माणसं एकमेकांच्या जवळ येत नव्हती.अशावेळी रणजीत बुडकर हे गोकुळ दूध दररोज पहाटे उठून पुलाची शिरोलीसह औद्योगिक वसाहतीत ग्राहकांना … Read more

‘नगरसेवक दिव्यांगांच्या दारी’ उपक्रमातून शिरोळ नगरपरिषदेची संवेदनशील पुढाकार – २०० दिव्यांग लाभार्थ्यांना ५% अनुदानाचे वितरण

शिरोळ / प्रतिनिधी  समाजातील प्रत्येक घटकाचा सन्मान राखत विकासाच्या प्रवाहात सर्वांना समान संधी मिळावी, ही शासन व्यवस्थेची प्राथमिक जबाबदारी मानली जाते. विशेषतः दिव्यांग व्यक्तींसाठी केवळ योजना आखणे पुरेसे नसून त्या योजना त्यांच्या दारी पोहोचणे अत्यावश्यक आहे. याच जाणिवेतून शिरोळ नगरपरिषदेकडून ‘नगरसेवक दिव्यांगांच्या दारी’ हा अभिनव व समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या … Read more

टाकळीवाडीच्या कन्येचा सांगलीत सन्मान; कर्तव्यदक्ष सेवेमुळे कविता निर्मळे यांचा गौरव

टाकळीवाडी / प्रतिनिधी  येथील कन्या कविता पुंडलिक निर्मळे यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि परिश्रमाच्या जोरावर पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करत सांगलीत सन्मान मिळवला आहे.सांगली येथील विश्रामबाग पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कविता निर्मळे यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.या सन्मानामुळे त्यांच्या कुटुंबियांसह संपूर्ण टाकळीवाडी गावाचा अभिमान उंचावला … Read more

रामनवमी निमित्त शिरोली पुलाची येथे महाप्रसाद व सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे  पुलाची शिरोली येथील श्रीरामनवमी निमित्त पुलाची शिरोली येथील मार्बल लाईन परिसरात श्रीराम वाहतूक मालक संघटना व हमाल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. धार्मिक उत्साहाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत या कार्यक्रमात विविध उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला.यावेळी … Read more

नानक साई फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने राज्यस्तरीय समाज गौरव पुरस्कार सुनील कांबळे यांना प्रदान

पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे  नानक साई फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने राज्यस्तरीय समाज गौरव पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा या वेळी सन्मान करण्यात आला. दैनिक पुढारीचे ज्येष्ठ पत्रकार व महाराष्ट्र पत्रकार संघ राज्य उपाध्यक्ष आणि मार्गदर्शक मा. श्री. सुनील कांबळे (बापू) यांना त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल समाज गौरव … Read more

दूधगंगा पाणी योजनेतील त्रुटींवर प्रशासन मौन का? नागरिक संतप्त, जबाबदारांवर गंभीर आरोप

अब्दुललाट / प्रतिनिधी  अब्दुल लाट गावातील नागरिकांनी दूधगंगा नदी उगम पाणी योजनेतील गंभीर त्रुटींविरोधात गेल्या सहा महिन्यांपासून सुरू केलेले आंदोलन अद्यापही निष्फळ ठरत असल्याने संतापाची लाट उसळली आहे. वारंवार ग्रामपंचायत पदाधिकारी, सरपंच, सदस्य तसेच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी कार्यवाहीचे आश्वासन दिले, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.या पार्श्वभूमीवर 16 मार्च रोजी ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला … Read more

मिरजेत आपत्तीग्रस्तांना दिलासा : महापौर धीरज सूर्यवंशी यांचा तत्पर दौरा, मदतीचे आश्वासन

मिरज / प्रतिनिधी  मिरज शहरातील ईदगाह माळ परिसरात मुसळधार पावसामुळे झाड कोसळून अनेक घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या घटनेनंतर महापौर धीरज सूर्यवंशी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत बाधित कुटुंबांना दिलासा दिला आणि परिस्थितीचा आढावा घेतला.या नैसर्गिक आपत्तीमुळे काही कुटुंबांचे मोठे नुकसान झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.अशा परिस्थितीत महापौर सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष … Read more

चोरपावलाने नळ पाणी योजनेची सुरुवात; आंदोलन अंकुश संघटनेचा संतप्त आरोप

शिरोळ / प्रतिनिधी  शहरातील नवीन नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाची चोरपावलाने सुरुवात केल्याचा गंभीर आरोप आंदोलन अंकुश संघटनेने केला असून, या संपूर्ण प्रकरणामागे राजकीय साठमारी आणि जनतेची फसवणूक असल्याचा घणाघाती आरोप करण्यात आला आहे.नगरपरिषद निवडणुकीच्या अगोदर तब्बल ९० दिवस आंदोलन करून शहराला नेमके काय मिळाले, असा सवालही संघटनेने उपस्थित केला आहे.संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “ठेकेदार … Read more