जिल्हा परिषद शाळांच्या प्रशासकीय कामांबाबत आढावा बैठक संपन्न

कुरुंदवाड / प्रतिनिधी शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १५३ शाळांच्या मुख्याध्यापकांची प्रशासकीय कामांबाबतची आढावा बैठक श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड येथे संपन्न झाली.प्रथमतः प्राचार्य आर.जे.पाटील यांचे हस्ते गट शिक्षण अधिकारी भारती कोळी यांचे स्वागत करण्यात आले.प्रा.भोजे यांनी सर्वांचे स्वागत केले.प्रारंभी संजय बापू गायकवाड यांनी ऑनलाईन कामकाजाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.गटशिक्षण अधिकारी भारती कोळी यांनी प्रशासकिय कामकाजाबाबत मार्गदर्शन … Read more

दिलीपराव माने म्हणजे शिरोळचे भूषण – सचिन हळदक

दिलीपराव माने म्हणजे शिरोळचे भूषण : सचिन हळदक शिरोळ /  प्रतिनिधी दिलीपराव माने यांनी आयुष्यभर प्रामाणिक व विश्वासाने लोकसेवेचे कार्य केले आहे.सामाजिक व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून त्यानी युवा पिढीसमोर आदर्श निर्माण केला आहे.समाजाप्रती केलेल्या आदर्शवत कामामुळेच दिलीपराव माने यांच्या कार्याचा गौरव होत असून माने परिवाराचे समाजाभिमुख कार्य शिरोळ गावासाठी भूषणावह आहे, असे मत … Read more

अन्यथा ‘खळ – खट्याक’ आंदोलन करू मनसेने दिला इशारा

जयसिंगपूर / प्रतिनिधी जयसिंगपूर शहरातील सर्वच आस्थापना वरील फलक मराठीमध्ये लावण्याची सूचना देणे बाबत जयसिंगपूर नगरपरिषदच्या उपमुख्याधिकारी प्रमिला माने,पोलीस निरीक्षक संदिप कोळेकर व जयसिंगपूर व्यापारी महासंघाच्या पदाधिकारी यांना मनसे जयसिंगपूर शहरच्या वतीने निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे व महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम, १९६१ च्या नियम ६ अन्वये नोंदणी करताना सर्वच … Read more

जिल्हा वार्षिक नियोजन व 15 वा वित्त आयोग निधीतून विविध विकास कामांचा मा जि प अध्यक्षा सौ शौमिका महाडिक यांच्या हस्ते शुभारं

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे पुलाची शिरोलीच्या विकास हाच आमचा ध्यास आहे आणि यामध्ये माजी आमदार अमल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली व सौ.शौमिका महाडिक यांच्या शुभ हस्ते व लोकनियुक्त सरपंच सौ पद्मजा करपे यांच्या शुभ हस्ते कामास शुभारंभ करणेत आला.त्यावेळी शिरोली गावास कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडणार नाही. तसेच गावास स्वच्छ व सुंदर बनवून आणि … Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांना जन्मदिनी उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार माननीय श्री.शरदचंद्रजी पवार साहेब आपणास या जन्मदिनी उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक – श्री विक्रमसिंह बापूसाहेब जगदाळे अध्यक्ष शिरोळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जगदाळे परिवार शिरोळ

कोळी समाज भूषण पुरस्काराने डॉ. मनोहर कोळी सन्मानित

सांगली / प्रतिनिधी महर्षि वाल्मिकी चॅरिटेबल ट्रस्ट सांगली यांचे वतीने देण्यात येणारा २०२३ चा कोळी समाज भूषण पुरस्कार कोल्हापूर येथील कोळी जमातीचे अभ्यासक डॉ.मनोहर दादू कोळी यांना सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक – वैभव शिंदे यांचे हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.महर्षि वाल्मिकी चॅरिटेबल ट्रस्ट सांगली मार्फत दरवर्षी वधू – वर मेळावा आयोजित करण्यात येतो.त्याचप्रमाणे कोळी … Read more

शरद इन्स्टिट्युटमध्ये १५ व १६ डिसेंबर आंतरराष्ट्रीय परिषद दोन दिवस परिषद : ‘अॅडव्हान्स कॉम्प्युटींग’ विषयावर तज्ञांकडून मार्गदर्शन

यड्राव / प्रतिनिधी यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये इंटरनॅशनल अॅडव्हान्स कॉम्प्युटींग या विषयावर परिषद (कॉन्फरन्स) होणाऱ आहे. डिसेंबरच्या १५ व १६ ला हि परिषद असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉनॉजीकल विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के.व्ही. काळे व वारंगळ (हैद्राबाद) येथील एस.आर. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिपक गर्ग प्रमुख उपस्थीत राहणार आहेत.परिषदेसाठी अॅडव्हान्सेस इन ए.आय., अॅडव्हान्सेस … Read more

स्व.माजी आमदार डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

शिरोळ / प्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे शिल्पकार,शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी चेअरमन,माजी आमदार स्व.डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटीलसाहेब यांची पुष्पकमल अर्पण करुन अभिवादन केले.तसेच याप्रसंगी निवृत्त सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख,शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,अजय राजेंद्र पाटील यड्रावकर,डॉ.अशोकराव माने,इकबाल बैरागदार ,गजानन संकपाळ,विजय आरगे,दत्त तोडणी वहातूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी … Read more

दूध संस्थांना आनंदाची बातमी, दूध संस्था अवसायनात काढणे आदेश रद्द

५० लिटिरपेक्षा दूध संकलन कमी असलेल्या दूध संस्था अवसायनात काढण्याचे आदेश पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्रालयाने दिले होते,यामुळे जिल्ह्यातील ११०८ संस्थांना सहायक निबंधकांनी नोटीस काढली होती.आज दुग्धविकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी राज्यातील बंद पडलेल्या व पोटनियमानुसार पूर्तता न करणाऱ्या दूध व पशुसंवर्धन संस्था ५० अवसायनात काढण्याचे आदेश मुंढे यांनी दिले.तीस दिवसांत याबाबतचा खुलासा करण्याचे आदेश … Read more

सदलगा शहरातील दूधगंगा नदीवरील स्मशानभूमीकडे नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष, स्मशानभूमीतील अनेक गैरसोयीने नागरिकांचे हाल

सदलगा / प्रतिनिधी अण्णासाहेब कदम चिकोडी तालुक्यातील सदलगा हे शहर अंदाजे 35 ते 40 हजार लोकवस्तीचे शहर आहे या ठिकाणी नगरपालिका असून या नगरपालिकेने आतापर्यंत सदलगा शहरातील स्मशानभूमीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून तेथे कोणत्याही प्रकारची मूलभूत सुविधा लोकांना नाही.अंतिम संस्कारसाठी आलेल्या जनतेला बसण्यास निवारा नाही,शव दहन करण्याकरिता शव दाहिन्या व्यवस्थित नाहीत,पाण्याची सोय नाही, दिवाबत्तीची सोय … Read more