सारथी शिष्यवृत्ती योजनेत नम्रता पाटीलची निवड; यशोदीप अकॅडमीतर्फे गौरव

शिरोळ / प्रतिनिधी  जिद्द,परिश्रम आणि योग्य मार्गदर्शन यांच्या जोरावर कु.नम्रता राजेंद्र पाटील हिने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.सारथी (छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था) यांच्या शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण योजनेत तिची निवड झाली असून,यामुळे तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीला भक्कम आधार मिळाला आहे. मराठा, कुणबी-मराठा आणि कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी सारथी संस्थेमार्फत … Read more

डॉ.दगडू माने यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करून जपली सामाजिक बांधिलकी 

शिरोळ / प्रतिनिधी वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस न मानता समाजासाठी काहीतरी करण्याची संधी म्हणून साजरा करण्याचा आदर्श येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. दगडू माने यांनी घालून दिला आहे.त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमांमधून समाजात सकारात्मक संदेश देण्यात आला.डॉ. माने यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आई’ वृद्धाश्रम येथे “आयुष्याची संध्याकाळ” या … Read more

जोतिबा यात्रेनंतर जि प सदस्या सोनाली सावंत यांनी घेतला स्वच्छतेसाठी पुढाकार 

कोल्हापूर / प्रतिनिधी  वाडी रत्नागिरी येथील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र जोतिबा चैत्र यात्रेचा उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने संपन्न झाला.यात्रेदरम्यान राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शन घेतले.मात्र,यात्रेनंतर जोतिबा डोंगर परिसरात आणि कासारवाडी ते डोंगर रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याचे चित्र पाहायला मिळाले.यामुळे परिसराचे सौंदर्य धोक्यात आले होते.याच पार्श्वभूमीवर भादोले जिल्हा … Read more

पुलाची शिरोलीत महिला दिनानिमित्त विविध स्पर्धांचा जल्लोष; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे पुलाची शिरोली येथे जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत शिरोली यांच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करून महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बिरदेव मंदिर हॉल व बुदले हॉल येथे आयोजित या कार्यक्रमाला गावातील महिलांचा मोठ्या संख्येने प्रतिसाद लाभला.या निमित्ताने रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, पाककला स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा तसेच ‘होम मिनिस्टर’ … Read more

“रक्ताच्या नात्यांची आस… पण आम्ही करावं तरी काय?” निमशिरगावच्या ‘आई’ वृद्धाश्रमातील मातांच्या मनात दडलेलं अथांग दुःख… 

शिरोळ / प्रतिनिधी  “नात्यात रमावसं वाटतं… पण रक्ताच्या नात्यांनीच पाठ फिरवली, तर मन कुठे जावं?” हा प्रश्न आहे निमशिरगाव येथील ‘आई’ वृद्धाश्रमात राहणाऱ्या त्या मातांचा, ज्यांनी आयुष्यभर संसारासाठी कष्ट केले, मुलांना वाढवलं, संस्कार दिले…पण उतारवयात मात्र एकटेपणाची शिक्षा भोगावी लागते आहे. डोळ्यांत अश्रू, ओठांवर हलकंसं हसू आणि मनात दडलेलं अथांग दुःख… अशा अवस्थेत या मातांनी … Read more

“निमित्त वाढदिवसाचे, प्रबोधन समाज मनाचे!” डॉ.दगडू माने यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी होणार साजरा

शिरोळ / प्रतिनिधी कलाविश्व रंगभूमी संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासनाचे समाजभूषण डॉ.दगडू श्रीपती माने यांचा वाढदिवस बुधवारी १ एप्रिल रोजी साधेपणाने आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा होणार आहे.वाढदिवसानिमित्त “निमित्त वाढदिवसाचे, प्रबोधन समाज मनाचे!” या संकल्पनेतून मंगळवार (दि.३१) व बुधवार (दि. १) असे दोन दिवस विविध समाजाभिमुख कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजक राजा प्रधान … Read more

शेतीच्या वादातून हिंगणगावात दुहेरी खून; बाप-लेकाचा मृत्यू, संशयित आरोपी भाऊ ताब्यात

हातकणंगले / प्रतिनिधी तालुक्यातील हिंगणगाव येथे शेतीच्या वादातून दोन भावांमध्ये झालेल्या वादाचे भीषण रूपांतर दुहेरी खुनात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.या घटनेत लहान भाऊ शितल मारुती कुंडले (वय ४०) व वडील मारुती बंडू कुंडले (वय ७२) यांचा मृत्यू झाला असून थोरला भाऊ संभाजी मारुती कुंडले (वय ४७) याच्यावर खुनाचा आरोप आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कुंडले कुटुंबातील … Read more

डब्बल महाराष्ट्र केसरी किताबावर पै.अमृता पुजारीची मोहोर; शिरोळात जल्लोष

शिरोळ / प्रतिनिधी शिरोळच्या कुस्ती परंपरेला नवा मानाचा तुरा रोवणारी सुकन्या पै.अमृता शशिकांत पुजारी हिने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत पुन्हा एकदा दैदिप्यमान कामगिरी करत “डब्बल महाराष्ट्र केसरी” हा बहुमानाचा किताब पटकावला आहे. तिच्या या ऐतिहासिक यशामुळे शिरोळ शहरासह संपूर्ण परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.अमृता पुजारी हिने यापूर्वीही महिला कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताब जिंकत आपली छाप … Read more

शिरोली परिसराला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले,संरक्षण भिंत व झाड कोसळून २५ लाखाचे नुकसान

वादळी वाऱ्यास पावसामुळे शिरोली औद्योगिक वसाहतीमधील येथील मेनन पिस्टन लिमिटेड या कंपनीत संरक्षण भिंत व झाड पार्किंग शेडवर कोसळून २५ लाखाचे नुकसान झाले पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे  शिरोली परिसराला आज शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका शिरोली औद्योगिक वसाहतीमधील येथील मेनन पिस्टन लिमिटेड या कंपनीत संरक्षण … Read more

आदर्श मातृत्वाचा गौरव : श्रीमती सुगंधा माने यांना ‘आदर्श माता पुरस्कार’

शिरोळ / प्रतिनिधी शिरोळ येथील कलाविश्व रंगभूमी व आधार सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श व्यक्तींचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधत शिरोळ येथील ९२ वर्षीय श्रीमती सुगंधा रामचंद्र माने यांना ‘आदर्श माता पुरस्कार’ प्रदान करून त्यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनप्रवासाचा सन्मान करण्यात आला.सांगली येथे … Read more