सुंदर गाव स्पर्धेत पुलाची शिरोली ग्रामपंचायत प्रथम

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे माजी ग्रामीण विकास मंत्री आर .आर. पाटील सुंदर गाव स्पर्धेत हातकणंगले तालुक्यात पुलाची शिरोली ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. 2022 – 23 मध्ये सुंदर गाव या योजने अंतर्गत केलेल्या कामाची सण 23 24 मध्ये क्रॉस तपासणी करण्यात आली होती. यामध्ये शिरोली ग्रामपंचायतीस शंभर पैकी ९१ गुण मिळाले आहेत. … Read more

महाराष्ट्र केसरी किताब विजेती पैलवान अमृता पुजारीचा सोमवारी नागरी सत्कार

शिरोळ / प्रतिनिधी चंद्रपूर येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत महिला गटात शिरोळ येथील पैलवान कु अमृता शशिकांत पुजारी हिने महाराष्ट्र महिला केसरी किताब मिळवल्याबद्दल शिरोळ नगरपरिषद व शहरवासिय यांच्या वतीने पैलवान अमृता हिला मानपत्र,चांदीची गदा व आरोग्य विमा पॉलिसी देऊन गौरविण्यात येणार आहे.सोमवारी २५ डिसेंबर सायंकाळी ६ वाजता पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व खासदार … Read more

आमदार प्रकाश आवाडे यांची ‘ही’ अधिवेशनात मागणी

अंगणवाडी सेविका,मदतनीस, आशा वर्कर्सना कायमस्वरूपी शासकीय सेवेत घ्या इचलकरंजी / प्रतिनिधी राज्यातील अंगणवाडी सेविका,मदतनीस आणि आशा वर्कर्स यांना कायमस्वरुपी शासकीय सेवेत सामावून घेण्यासंदर्भात राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार प्रकाश आवाडे यांनी नागपूर अधिवेशनात केली.अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळणारे मानधन तुटपुंजे असून शासन त्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जाही देत नाही.त्यामुळे कायद्याचे संरक्षण,महागाई भत्ता … Read more

गावखडी ते अक्कलकोट मनोरथ पूर्ती पदयात्रेचे अन्नपूर्णा हॉटेलच्यावतीने स्वागत

गावखडी ते अक्कलकोट मनोरथ पूर्ती पदयात्रेचे अन्नपूर्णा हॉटेलच्यावतीने दिमाखात स्वागत रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील भक्तगणांचे मनोरथ सिध्द करणारी गावखडी ते अक्कलकोट मनोरथ पूर्ती पदयाञा प्रतिवर्षी प्रमाणे श्री स्वामी समर्थ मठ गावखडी मठाधिपती श्री सदगुरू दास दिगंबर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेञ गावखडी ते श्री क्षेञ अक्कलकोट दि.13 डिसेंबर ते दि.30 डिसेंबर 2023 या कालावधीत आयोजित … Read more

‘राजकीय बातमी’ खासदार आण्णासाहेब जोल्ले यांनी घेतली केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट

निपाणी / प्रतिनिधी चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आण्णासाहेब जोल्ले यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.याप्रसंगी त्यांनी चिकोडी लोकसभा कार्यक्षेत्रातील मुरगुंडी ते चिकोडीपर्यंत ६५ कि.मी.अंतराच्या राष्ट्रीय महामार्ग रस्ताकामाला मंजुरी दिल्याबद्दल अभिनंदन करून त्यांचे आभार मानले.याचवेळी त्यांनी चिकोडी बायपाससह चिकोडी शहरापासून गोदूरपर्यंत २७ कि.मी.चारपदरी महामार्ग डीपीआर सादर करून राष्ट्रीय … Read more

‘या’ राशींना मिळणार मिळणार मोठं यश, पाहा आजचे राशीभविष्य

‘या’ राशींना मिळणार मिळणार मोठं यश , पाहा आजचे राशीभविष्य मेष – आज बोलण्यावर संयम ठेवा,आज तुम्हाला तुमच्या वडिलोपार्जित मालमत्तेचा फायदा मिळणार,सरकारी योजनांचा लाभ मिळेल वृषभ – आज महत्वाची कामे वेळेत पूर्ण करा,  आजचा दिवस मानसिक शांतता देईल, व्यावसायिकाना फायदा मिळेल मिथुन – अजचाव दिवस खर्चाचा असेल, कर्ज फेडण्यात यशस्वी व्हाल, आज तुम्ही आनंदी रहाल. … Read more

पित्ताशय खड्याचा त्रास आहे…मग हा व्हिडीओ पहाच

पित्ताशय खडा (Gall bladder stone )- ८० % पित्ताशय खडे हे कोलेस्टे्रोल मुळे होतात म्हणून कोलेस्टे्रोल नियंत्रित राहण्यासाठी जास्तीत जास्त फळे व भाज्यांचा आहार घेणे हितावह आहे.जीवनसत्व युक्त आहाराने पित्ताशय खडे लवकर विरघळून जातात. कारणे-तेलकट व मसालेदार,चरबीयुक्त पदार्थ, नॉनव्हेज,पिस्टमय पदार्थांचा जास्त वापर,जंक फुड,सतत पित्ताच्या गोळया खाणे,बदलती जीवनशैली. लक्षणे – उजव्या बाजूला छातीत कळ येणे,उजव्या खांद्यापासून … Read more

निपाणी हालशुगरकडून २४.१० कोटीचे ऊस बिल अदा – चेअरमन एम.पी.पाटील यांची माहिती

निपाणी / प्रतिनिधी निपाणीसह परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांसाठी तारणहार ठरलेल्या हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वीरित्या सुरू आहे.कारखान्याने १ डिसेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान, ८० हजार ३३८ मॅट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. या उसाचे प्रतिटन ३००० रुपये प्रमाणे होणारे २४.१० कोटी रुपये ऊस बिल ऊस पुरवठा केलेल्या संबंधित ऊस उत्पादक शेतकरी … Read more

सेवानिवृत्त केंद्र प्रमुख हाजी झाकीर पटेल यांचे अपघाती निधन

नृसिंहवाडी / प्रतिनिधी पंचायत समिती शिरोळ कडील उर्दू शिरोळ केंद्राचे सेवानिवृत्त केंद्र प्रमुख हाजी झाकिर सरवर पटेल (वय ६० )औरवाड यांचा बुधवारी सायंकाळच्या दरम्यान अपघाती निधन झाले.सर्वाना प्रेमळ व आपुलकीच्या भावनेने वागाविणारे,निगर्वी व्यक्तीमत्त्व हरपल्याची भावना शिक्षक वर्गातून व्यक्त होत आहे.उर्दू शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष नियाज पटेल यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी,नातवंडे, भाऊ,बहिणी असा परिवार … Read more

नृसिंहवाडी श्री स्वामी समर्थ गुरुपीठात सामुहिक श्री गुरुचरित्र वाचनास सुरुवात

नृसिंहवाडी / प्रतिनिधी दत्तजयंती निमित्त श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठात आजपासुन अखंड नाम,जप,यज्ञ व सामुहिक श्री गुरुचरित्र पारायण वाचन सप्ताहास सुरुवात झाली.सकाळी वीणा,टाळ,माळ,सर्व ग्रंथ,आयुधांची  विधीवत  पुजन करुन सप्ताहाकाळातील अकरा विभागाच्या सेवा सुरु करण्यात आल्या.यामुळे पुर्ण सप्ताहात २४ तास अखंडीतपणे श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन,नामस्मरण करीत अखंड वीणा वादन,नामजप सेवा श्री स्वामी चरणी … Read more