शिरोली एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गुटख्यासह ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे  पुलाची शिरोली परिसरात अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करत सुमारे ६५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी सुमारे ४:४० वाजण्याच्या सुमारास पुलाची शिरोली … Read more

चला निवारा वाढवू पक्ष्यांचा… आसरा बनू पर्यावरणाचा, श्री पद्माराजे विद्यालयाचा नाविन्यपूर्ण उपक्रम 

शिरोळ / प्रतिनिधी  श्री पद्माराजे विद्यालयात पर्यावरण संवर्धनाचा अनोखा आणि प्रेरणादायी “एक घर पक्ष्यासाठी” हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.या नावीन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांनी सुमारे २५० हून अधिक पर्यावरणपूरक पक्षीघरटी स्वतःच्या कल्पनेतून तयार करून निसर्गप्रेमाचा सुंदर संदेश दिला. वाढत्या सिमेंटच्या काँक्रिटीकरणामुळे आणि झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणामुळे अनेक पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत. त्यामुळे पूर्वी अंगणात सहज दिसणारे … Read more

श्री भैरेश्वर मंदिरात यात्रेनिमित मंदिरावर हेलिकॉप्टरमधून होणार पुष्पवृष्टीचा अद्वितीय सोहळा

शिरटी / प्रतिनिधी  कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील शिरटी गाव सध्या भक्ती,परंपरा आणि उत्साहाच्या संगमाने उजळून निघाले आहे. कृष्णा नदीच्या पवित्र काठावर वसलेले हे गाव आपल्या ग्रामदैवत श्री भैरेश्वराच्या यात्रेसाठी संपूर्ण जिल्ह्यात ओळखले जाते. यंदाची यात्रा शनिवारी दि. ११ एप्रिल ते मंगळवार दि. १४ एप्रिल २०२६ या कालावधीत मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडत आहे. शिरटी … Read more

जागतिक आरोग्य दिनानिमित्त जायंट्स ग्रुपच्या वतीने आयुर्वेद जनजागृती उपक्रम

शिरोळ / प्रतिनिधी  जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून जायंट्स ग्रुप ऑफ दुर्गा सहेली मौजे आगर आणि जायंट्स ग्रुप ऑफ जयसिंगपूर गोल्ड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयुर्वेदाचे आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्व,तसेच आयुर्वेदिक उपचार आणि औषधांविषयी माहिती देणारा उपक्रम सिद्धिविनायक सोसायटी येथे उत्साहात पार पडला.या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला.या उपक्रमासाठी वाई (जिल्हा … Read more

विद्या मंदिर शिरोली नं. 3 चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे  पुलाची शिरोली येथील विद्या मंदिर शिरोली नं. 3 या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवार, दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सात वाजता मोठ्या उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा हा कार्यक्रम पालक, ग्रामस्थ व मान्यवरांच्या उपस्थितीत जल्लोषात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक श्री. जी. जी. पाटील यांनी उपस्थित … Read more

दुर्गा सहेलीमार्फत पाणपोई उपक्रमाचे मौजे आगर गावात कौतुक

शिरोळ / प्रतिनिधी  मौजे आगर गावातील सोसायटी परिसरात जायंट्स ग्रुप ऑफ दुर्गा सहेली यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या पाणपोई उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिकांना विशेषतः पिण्याच्या पाण्याची मोठी गरज भासत असताना या उपक्रमामुळे परिसरातील रहिवासी, तसेच येणारे-जाणारे वाटसरू आणि विद्यार्थी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.या सोसायटी परिसरातून अनेक विद्यार्थी दररोज कॉलेजसाठी ये-जा … Read more

समाजकल्याण सभापतीपदी श्रद्धाताई गायकवाड स्वीकारला पदभार

कोल्हापूर / प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापतीपदी श्रद्धाताई गायकवाड यांनी आज पदभार स्वीकारला. राजर्षी शाहू विकास आघाडीचे प्रमुख आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला. या प्रसंगी विविध पदाधिकारी, अधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी श्रद्धाताई गायकवाड यांचे अभिनंदन करून त्यांच्या … Read more

यड्राव को-ऑप बँकेचा आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये रु. ४१५ कोटींचा व्यवसायः चेअरमन अजय राजेंद्र पाटील यड्रावकर

शिरोळ / प्रतिनिधी  सहकारमहर्षी शामरावआण्णा पाटील यड्रावकर यांनी स्थापन केलेल्या, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या यड्राव को-ऑपरेटिव्ह बँकेने आपला प्रगतीचा आलेख चढता ठेवला आहे.याबाबत अधिक माहिती देताना बँकेचे अध्यक्ष अजय राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले की बँकेने २०२५-२६ या चालू आर्थिक वर्षात रु. ४१५ कोटी रुपयांचा मिश्र व्यवसाय केला असून रु. … Read more

शिरोळमध्ये खंडोबा यात्रेनिमित्त भंडारखाना भक्तिमय वातावरणात संपन्न

शिरोळ / प्रतिनिधी  येथील रहिमतपूरकर माने समाजाचे कुलदैवत असलेल्या मंगसुळीच्या खंडोबा देवाची वार्षिक यात्रा यंदा मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने पार पडली. या पार्श्वभूमीवर श्री म्हाळसाकांत मंडळ, शिरोळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भंडारखान्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.शिरोळ शहरासह परिसरातील हजारो भाविकांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला.मंगसुळी देवस्थान येथे माने समाजाला सासनकाठीचा मान आहे.ही परंपरा अनेक … Read more

शिरढोण हादरले! निष्काळजी कामामुळे झाड कोसळून तरुण गंभीर जखमी

शिरढोण / प्रतिनिधी  शिरढोण येथे गुरुवारी दि.२ एप्रिल रात्री साडे आठच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. स्वाद हॉटेलजवळून दुचाकीवरून जात असताना अचानक झाड कोसळून विजय कोपार्डे (रा.शहापूर) हा तरुण गंभीर जखमी झाला.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून संबंधित कामातील निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला जात आहे.प्राप्त माहितीनुसार,कोपार्डे हे नेहमीप्रमाणे दुचाकीवरून जात असताना रस्त्यालगत असलेले झाड अचानक … Read more