आरोग्य आणि सदाचारातून व्यसनमुक्तीकडे वळणे काळाची गरज; नाना पाटील

स्मँक येथे कै. सुनील जनवाडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त व्याख्यान पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे आजच्या धावपळीच्या युगात शरीर आणि मन सुदृढ ठेवण्यासाठी चांगल्या सवयींची गरज आहे. सदाचार आणि आरोग्याची जाणीव ठेवली तर तरुण पिढी व्यसनांपासून दूर राहू शकते.” , असे प्रतिपादन नाना पाटील यांनी केले ते स्मँक येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर (स्मॅक) … Read more

शिरोलीत प्रो-लीग कबड्डी स्पर्धे सिद्धांत वॉर, आर आर किंग, शिवशाही आणि शिवसूत्र संघांची विजयी सलामी!

पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे  पुलाची शिरोली, ता. हातकणंगले येथील सर्वेश्वर कला, क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळाच्या वतीने आयोजित ७० किलो वजनी गटाच्या ‘महासंग्राम’ लीग कबड्डी स्पर्धेचा थरार छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर अत्यंत उत्साहात सुरू झाला आहे. कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रंगणाऱ्या या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सिद्धांत वॉर टॅकल्स, आर आर किंग, शिवशाही इलेक्ट्रीकल … Read more

पृथ्वीराजसिंह यादव,अमरसिंह पाटील आणि अशोकराव माने आले एकत्र 

  १ जून रोजी शिरोळ भूषण पुरस्कार वितरण सोहळा पृथ्वीराज यादव,अमरसिंह पाटील आणि डॉ.अशोकराव माने यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक उत्साहात   शिरोळ / प्रतिनिधी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिरोळचे सुपुत्र दलितमित्र डॉ.अशोकराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘शिरोळभूषण’ पुरस्कार वितरण सोहळा येत्या १ जून २०२६ रोजी शिरोळ येथे उत्साहात पार पडणार आहे. … Read more

पत्रकारितेत सत्याचे मूल्य सर्वतोपरी; ज्ञान व कौशल्याची सांगड घालण्याची गरज : प्राचार्य डॉ. विरूपाक्ष खानाज

इचलकरंजीच्या नाईट कॉलेजमध्ये ‘मुक्तसंवाद’ अंकाचा प्रकाशन सोहळा संपन्न! इचलकरंजी / प्रतिनिधी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (नाशिक) अभ्यास केंद्र,नाईट कॉलेज ऑफ आर्टस अँड कॉमर्स, इचलकरंजी येथील तृतीय वर्ष जनसंज्ञापन व वृत्तपत्र विद्या विभागाच्या वतीने ‘मुक्तसंवाद’ अंकाचा प्रकाशन सोहळा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे … Read more

संकटात झुंजणाऱ्या माणसांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा – कु. प्रज्ञा माळकर

कुरुंदवाड / प्रतिनिधी  आज खर तर आपल्या आजूबाजूला समाजात पाहतोय परिस्थिती अशी झाली आहे की वाद,कलह,विसंवाद, भांडण, नैराश्य,घटस्फोट,आत्महत्या आणि माणसामाणसांमधले हेवेदावे वाढत चालल्यामुळे आज माणसाचे आयुष्य जे आहे.ते अक्षरशः काळवंडून गेले आहे.अशा प्रसंगी संकटात झुंजणाऱ्या माणसांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे असे प्रतिपादन युवा व्याख्यात्या कु.प्रज्ञा श्रीकांत माळकर यांनी केले.त्या साधना मंडळ कुरुंदवाड व राष्ट्रसेवा दल … Read more

शिष्यांच्या प्रेमाने भारावले गुरुजन : भगवान कोळी तब्बल २७ वर्षांनंतर जुन्या आठवणींना उजाळा! 

जुने दानवाड येथील कुमार विद्या मंदिरच्या १९९८-९९ बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न.   हेरवाड / प्रतिनिधी माणूस कितीही मोठा झाला तरी शालेय जीवनातील आठवणी आणि मित्र कधीच विसरता येत नाहीत, याचाच प्रत्यय जुने दानवाड येथे आला. कुमार विद्या मंदिर, जुने दानवाड (ता.शिरोळ) येथील इयत्ता ७ वीच्या १९९८-९९ बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २७ वर्षांनंतर एकत्र येत आपल्या … Read more

रखरखत्या उन्हात मुख्याध्यापकांचे ‘ग्रीन मिशन’ सुट्टीतही अब्दुल लाट शाळेतील झाडांना दिले जीवदान!

अब्दुल लाट / दिलीप शिरढोणे मे महिन्याच्या प्रखर उन्हामुळे संपूर्ण परिसर होरपळून निघत असताना, माणसांसह झाडे-झुडपांनाही जगण्यासाठी पाण्याची आस लागली आहे.वाढते तापमान, कोरडी जमीन आणि पाण्याची टंचाई यामुळे अनेक ठिकाणी हिरवाई नष्ट होताना दिसत आहे.अशा कठीण परिस्थितीतही एका संवेदनशील शिक्षकाने आपल्या शाळेतील झाडांना जिवंत ठेवण्यासाठी घेतलेली मेहनत सध्या सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे.केंद्रीय प्राथमिक शाळा,अब्दुल … Read more

समाजसेवेची यशस्वी घोडदौड : इंजि.नितीन शेट्टी आणि सौ.ऋतुजा शेट्टी या प्रेरणादायी दाम्पत्याचा दुहेरी वाढदिवस “दूग्धशर्करा योग”

समाजकार्य, प्रामाणिकपणा आणि माणुसकीचा सुंदर संगम शिरोळ / प्रतिनिधी  शिरोळ नगरीतील सामाजिक,शैक्षणिक आणि बांधकाम क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे इंजिनियर श्री.नितीन शेट्टी आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ.ऋतुजा नितीन शेट्टी या प्रेरणादायी दाम्पत्याचा आज १७ मे रोजी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. विशेष म्हणजे पती-पत्नी या दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी येत असल्याने हा दिवस त्यांच्या कुटुंबीयांसाठी,मित्रपरिवारासाठी … Read more

लव्ह जिहाद आणि अपप्रवृत्तींचा बिमोड करण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे: आमदार गोपीचंद पडळकर

पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि व्होट जिहादच्या माध्यमातून हिंदू धर्मावर होणारा अत्याचार आता कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. हिंदू मुलींचे आणि महिलांचे रक्षण करण्यासाठी संपूर्ण हिंदू समाजाने एकत्र येण्याची गरज आहे. जिथे लव्ह जिहादची प्रकरणे घडतील, तिथे गुन्हेगारांना आणि त्यांना साथ देणाऱ्यांना अद्दल घडवण्यासाठी आम्ही शिरोली ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे … Read more

टोप येथे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे टोप येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने टोप येथील प्रौढ प्रताप पुरंदर करवीर प्रांत टोप तसेच सकल हिंदू समाज यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी हनुमान मंदिर, टोप येथे टोपचे सरपंच तानाजी पाटील, शिवसेना नेते उत्तम पाटील, विजयसिंह … Read more