मान्सून काळात प्रशासनाने सज्ज राहावे प्रशासनाला आ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सूचना

मान्सूनपूर्वच्या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर मध्ये आढावा बैठक संपन्न जयसिंगपूर / प्रतिनिधी  मान्सूनपूर्वच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे,महापूर आणि संभाव्य दुष्काळ या दोन्ही संकटांचा सामना करण्यासाठी पूर्वतयारी आवश्यक आहे. निवारा केंद्रांमध्ये शौचालय, वीज, आरोग्य सुविधा, उद्‌घोषणा प्रणाली आणि बॅरिकेड्सची व्यवस्था करावे, पूरकाळात ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, बिट अंमलदार व संबंधित अधिकारी यांनी गाव न … Read more

हिंगणगादे प्रिमियर लीगमध्ये सनी स्पोर्टस् शिरोळ तालुका संघाचे अजिंक्यपदावर कोरले नाव

राज्यस्तरीय स्पर्धेत ७१ हजार रुपयांच्या प्रथम पारितोषिकासह कायम चषकावर कब्जा शिरोळ / प्रतिनिधी  हिंगणगादे (ता. खानापूर) येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय हिंगणगादे प्रिमियर लीग टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत सनी स्पोर्टस् शिरोळ तालुका (४०+) संघाने दैदिप्यमान कामगिरी करत अजिंक्यपद पटकावले. कर्णधार शिवाजी संकपाळ आणि अमोल भोजणे यांच्या कल्पक, अनुभवी व प्रभावी नेतृत्वाखाली संघाने स्पर्धेवर आपला ठसा उमटवत … Read more

समाजकारणाचा रंग जपणारं दिलदार व्यक्तिमत्त्व सामाजिक कार्यकर्ते तथा पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर संदीप महादेव माने यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास

शिरोळ / प्रतिनिधी  ऐतिहासिक, सामाजिक आणि पुरोगामी विचारांची परंपरा लाभलेल्या शिरोळ नगरीत अनेक व्यक्तिमत्त्वे आपल्या कार्यातून समाजासाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. व्यवसाय, समाजकारण, मैत्री, माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम ज्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतो, अशा युवा समाजसेवक तथा यशस्वी पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर “संदीप महादेव माने” यांचा गुरुवार दि. ४ जून रोजी वाढदिवस होत आहे.त्यानिमित्त त्यांच्या सामाजिक, … Read more

शिरोळच्या सामाजिक चळवळीतील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व: चंद्रकांत भाट यांचा संघर्षमय आणि कर्तृत्ववान जीवनप्रवास

शिरोळ | प्रतिनिधी समाजाच्या सुख-दुःखात स्वतःला झोकून देणारी माणसे विरळाच असतात. आपल्या कार्यातून, विचारातून आणि निस्वार्थ सेवाभावातून समाजमनावर अमिट ठसा उमटवणारी काही व्यक्तिमत्त्वे काळाच्या ओघात आदर्श ठरतात.शिरोळच्या सामाजिक, शैक्षणिक,पत्रकारिता आणि लोकहिताच्या क्षेत्रात गेली अनेक वर्षे सातत्याने कार्यरत असलेले पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तुकाराम भाट हे असेच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या संघर्षमय,कर्तृत्ववान … Read more

तवेरा ट्रायल ठरली जीवघेणी! गाडी पलटी होऊन तरुण मिस्त्रीचा जागीच मृत्यू; तिघे गंभीर जखमी

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे  कावळा नाका परिसरात बुधवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दुरुस्ती केलेल्या तवेरा वाहनाची ट्रायल घेण्यासाठी गेलेल्या तरुण मिस्त्रीचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले.या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.मृत तरुणाचे नाव दुर्गाप्रसाद हुवाप्पा इडी (वय 26, रा. कावळा नाका, मूळ रा. लोकापूर, कर्नाटक) असे आहे. ते … Read more

कोरोचीकरांचा आदर्श! माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षसंवर्धनाचा संकल्प

‘शिवप्रेमी मॉर्निंग ग्रुप’ने स्वीकारली वृक्ष संगोपनाची जबाबदारी कोरोची | प्रतिनिधी सध्याच्या बदलत्या हवामानाचा वाढता प्रभाव, जागतिक तापमानवाढ आणि पर्यावरणासमोरील गंभीर आव्हाने लक्षात घेता वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे.याच सामाजिक जाणिवेतून कोरोची येथील शिवाजीनगर परिसरात माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.केवळ वाढदिवस साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता पर्यावरण संवर्धनाचा … Read more

७२ वर्षीय तुकाराम पाटील यांची जलतरणात अनोखी कामगिरी; ५० मीटर अंडरग्राउंड स्विमिंग अवघ्या १ मिनिट ४० सेकंदांत पूर्ण

कोरोची / प्रतिनिधी  वय हा केवळ आकडा असतो, इच्छाशक्ती आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर कोणतीही गोष्ट साध्य करता येते, हे कोरोची येथील तुकाराम पाटील यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. कोरोची गोलघुमट कॉलनी येथील ७२ वर्षीय तुकाराम पाटील यांनी इचलकरंजी येथील शंकराव पुजारी स्विमिंग टँकमध्ये ५० मीटर (सुमारे १७० फूट) अंडरग्राउंड स्विमिंगचे अंतर अवघ्या १ … Read more

शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करण्याची मागणी; टाळाटाळ झाल्यास मोर्चाचा इशारा

पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी,अन्यथा अतिक्रमणधारकांच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात येईल,असा इशारा श्री शाहू स्वाभिमानी आघाडी व अतिक्रमणधारकांनी दिला आहे. याबाबत ग्रामपंचायत पुलाची शिरोलीच्या सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ तसेच शासनाच्या विविध निर्णयांनुसार शासकीय … Read more

बाप बेपत्ता झाल्याचा बनाव रचला; पण २४ तासांत मुलाचाच ‘गेम’ उलटला!

  शिरोली एमआयडीसी हादरली: दारुड्या बापाच्या त्रासाला कंटाळून मित्राच्या मदतीने पोटच्या मुलानेच केला खुन…  पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे वडिलांचा खून करायचा, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकायचा आणि स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन वडील बेपत्ता असल्याची खोटी तक्रार नोंदवायची… चित्रपटालाही लाजवेल असा हा खळबळजनक कट रचणाऱ्या पोटच्या मुलाचाच डाव पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उलटवून लावला … Read more

बेपत्ता तरुणाचा विहिरीत निर्घृण खून तोंडात कापड कोंबून डोक्यात वार

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता असलेल्या ४४ वर्षीय व्यक्तीचा अज्ञात कारणावरून तोंडात कापड कोंबून आणि डोक्यात पाठीमागून हत्याराने वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह शिरोली औद्योगिक वसाहतीमधील एका शेतातील विहिरीत फेकून देण्यात आला होता . याप्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती … Read more