नेज / प्रतिनिधी
हातकणंगले कुंभोज रोडवरील नेज गावाजवळ शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर रोजी रात्री साडे
बाराच्या सुमारास टेम्पो 407 या गाडीचा मोठा अपघात झाला.टेम्पो रस्त्याकडे असलेल्या ओढ्यात घसरून झाडाला धडकला.या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही,मात्र टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की नेज गावाजवळ रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास पेपर घेऊन जाणारा व टेम्पोचा चालकाला समोरून वाहनाच्या लाईटमुळे रस्ताच्या अंदाज न आल्याने टेंम्पोचे नियंत्रण सुटले व टेंम्पो रस्ताच्या कडेला असणाऱ्या ओढ्यात घसरून झाडाला धडकला यामध्ये टेंम्पोच व गाडीतील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.अचानक आवाज असल्याने घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन चालकाला बाहेर काढले.घटना रात्री उशिरा घडली असल्याने,पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले.या अपघाताची नोंद मध्यरात्री उशिरा हातकणंगले पोलिस ठाण्यात झाली आहे.