जनतारा शिक्षण संकुलणाला रुपालीताई चाकणकर यांची भेट

Spread the love

जयसिंगपूर / प्रतिनिधी

जीवनामध्ये जगत असताना प्रत्येक स्त्रीला सन्मानाने जगण्याचा अधिकार व हक्क मिळाला पाहिजे.प्रत्येक स्त्री ही मातेसमान आहे.प्रत्येक स्त्रीचा आपण सन्मान आदर केलाच पाहिजे.स्त्रियांनी स्वावलंबी बनले पाहिजे. त्यासाठी महिलांना सुरक्षा देण्याचे काम शासन करत आहे.प्रत्येक शाळा,शिक्षण संस्था येथे निर्भया पथक, महिला दक्षता समिती स्थापन झाल्या पाहिजेत. जेणेकरून प्रत्येक शाळेतील मुलगी निर्भय बनेल.तिला निर्भयपणे शिक्षण घेता येईल आणि ताठ मानेने समाजात वावरता येईल जगता येईल.यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एका शाळेला भेटी देण्याचं प्रयोजन असल्याचं सांगितलं.जयसिंगपूर येथील जनतारा शिक्षण संकुल विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम करणारी शाळा आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक धडपडत असतात.पुस्तकाबरोबरच अनुभवाचे ज्ञान देण्याचं काम शिक्षक करत असतात.आपण सर्वांनी आत्मविश्वासाने समाजात वावरले पाहिजे.यश अपयश जीवनामध्ये येत असतात.यशाने हुरळून जाऊ नये.अपयशाने खचून जाऊ नये.विद्यार्थ्यांना अपयशातून यशाकडे वाटचाल करण्यासाठी सर्वांनी विद्यार्थ्यांचे मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे.आई-वडिलांना आदर्श मानून प्रत्येकाने वाटचाल केली पाहिजे.यावेळी रूपालीताई चाकणकर यांनी विद्यार्थिनींची संवाद साधला त्यांना विविध माहिती विचारली.शाळेतील विद्यार्थिनींसाठी असणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल त्यांच्याशी हितगुज केले.यावेळी रूपालीताई चाकणकर यांनी जनतारा शिक्षण संकुलाच्या क्रीडा क्षेत्रातील व स्पर्धा परीक्षेतील यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व अध्यापकांचे अभिनंदन व कौतुक केले.दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेचे मुख्याध्यापक दीपक वाडकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.यामध्ये जनतारा शिक्षण संकुलाच्या स्पर्धा परीक्षा,क्रीडा क्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्तुंग यश यांचा आढावा घेतला. यावेळी गटशिक्षणाधिकारी भारती कोळी,विस्तार अधिकारी अनिल ओमासे,जनतारा शालेय समितीचे चेअरमन महावीर पाटील,नांद्रेकर ज्युनिअर कॉलेजचे चेअरमन राजेंद्र नांद्रेकर,लतीफ पटेल,पोलीस निरीक्षक सत्यवान हाके आदी मान्यवर उपस्थित होते.आभार पर्यवेक्षक विनोद मगदूम यांनी मानले.सूत्रसंचालन अध्यापिका अनिता चौगुले,सविता पाटील,मैथिली चौगुले व रिया काडगे,श्रेयसी ककडे यांनी केले.

error: Content is protected !!