सरपंच संतोष देशमुख यांच्या हल्लेखोरांना अटक करा अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी

इचलकरंजी / प्रतिनिधी
शहरातील अखिल भारतीय मराठा महासंघ

यांच्या वतीने आज प्रांतअधिकारी यांना बीड जिल्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीचे निवेदन देण्यात आले यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

                                             बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने सर्वत्र खळबळ उडाली आहे.सरपंचांची हत्या करणाऱ्या सर्व आरोपीना अजूनही अटक करण्यात आलेली नाही.तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून चार आरोपी फरार आहेत.मयत सरपंच संतोष देशमुख यांचे लायटरने डोळे जाळले,संपूर्ण पाठ काळीनिळी झाली होती,शेवटी जीव जात नव्हता म्हणून त्यांच्या छातीवर उड्या मारण्यात आल्याचा धक्कदायक खुलासा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केला आहे. संतोष देशमुख यांची हत्या का करण्यात आली? हत्यामागे कोण आहेत? याचा शोधत त्वरित घ्यावा.संतोष देशमुख हे मराठा आंदोलनातील सक्रिय कार्यकर्ते होते.तरी त्यांचे जे कोणी हल्लेखोर असतील त्या सर्वांना त्वरित अटक करून त्यांची सीबीआय चौकशी करून त्यामागे सूत्रधार कोण आहे हे शोधून त्या सर्वांना कठोर शिक्षा ‌द्यावी अन्यथा उग्र स्वरूपाच्या आंदोलन केले जाईल. अशा मागणीचे निवेदन आज मराठा महासंघाच्या वतीने प्रांतधिकारी मोसमी बोर्डे चौगुले यांना देण्यात आले.यावेळी संतोष सावंत,शहाजी भोसले,दिपक रावळ,अवधूत मुडशिंगीकर,अरुण मस्कर,किरण पोवार, रामचंद्र भोसले,संग्राम सटाले,विजय मुतालिक, सुरेश कापसे, भारत बोंगार्डे यांच्यासह अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
Spread the love
error: Content is protected !!