दत्तवाड / प्रतिनिधी
कुमार विद्या मंदिर नवे दानवाडच्या प्रांगणात मोठया उत्साहात सांस्कृतिक स्पर्धेस सुरुवात झाली. सचिन अंबुपे,स्वाती कुन्नुरे,शिवगोंडा पाटील यांचे शुभहस्ते उद्घाटन झाले.युनुस कुरणे,अनिल कुन्नुरे,हसन लाडखान, अरुण परीट,सूर्यकांत बेरड,केंद्रप्रमुख संजय निकम,केंद्र समन्वयक सुभाष कुरुंदवाडे, मुख्याध्यापक मारुती कोळी,कुमार सिदनाळे,सहदेव माळी,दत्तात्रय कमते, दिलीप शिरढोणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे -प्रश्नमंजुषा -प्रथम क्रमांक -टाकळीवाडी, द्वितीय क्रमांक – कन्या हेरवाड,तृतीय क्रमांक – केंद्रीय शाळा कन्या दत्तवाड.प्रश्नमंजुषा लहान गट – प्रथम क्रमांक – कन्या हेरवाड,द्वितीय क्रमांक – कुमार घोसरवाड,तृतीय क्रमांक -कुमार दत्तवाड,समूहगीत मोठा गट प्रथम क्रमांक – नवे दानवाड,द्वितीय क्रमांक – कन्या दत्तवाड, तृतीय क्रमांक -टाकळीवाडी,लहान गट प्रथम क्रमांक – नवे दानवाड, द्वितीय क्रमांक – कुमार दत्तवाड,तृतीय क्रमांक -कुमार हेरवाड,समूहनृत्य मोठा गट – प्रथम क्रमांक – नवे दानवाड,द्वितीय क्रमांक -टाकळीवाडी,तृतीय क्रमांक – कुमार हेरवाड,लहान गट प्रथम क्रमांक -टाकळीवाडी,द्वितीय क्रमांक – कन्या दत्तवाड,तृतीय क्रमांक -जुने दानवाड.नाटयीकरण मोठा गट प्रथम क्रमांक -टाकळीवाडी,द्वितीय क्रमांक – कन्या हेरवाड,तृतीय क्रमांक – कन्या घोसरवाड.लहान गट प्रथम क्रमांक – नवे दानवाड,द्वितीय क्रमांक – कन्या घोसरवाड,तृतीय क्रमांक -टाकळीवाडी.कथाकथन मोठा गट प्रथम क्रमांक – नवे दानवाड,द्वितीय क्रमांक – कन्या दत्तवाड,तृतीय क्रमांक -टाकळीवाडी.लहान गट प्रथम क्रमांक – नवे दानवाड,द्वितीय क्रमांक – कन्या दत्तवाड,
तृतीय क्रमांक – कन्या हेरवाड.समूहगीत व समूहनृत्य परीक्षक म्हणून स्नेहा संकपाळ,प्रकाश कोळी,महेश गवंडी यांचे सहकार्य लाभले.प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.स्पर्धा संयोजनासाठी मुख्याध्यापक मारुती कोळी,कल्लाप्पा पुजारी,शंकर पाटील,काशीनाथ मोडके,पुष्पा बाबर, विद्या सुतार,प्रतिभा मलकाने,कल्पना चौगुले यांनी परिश्रम घेतले.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सूर्यकांत बेरड व सर्व सदस्य,ग्रामपंचायत नवे दानवाडचे सरपंच व सर्व सदस्य,ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.