परभणी घटनेच्या निषेधार्थ नागांव, हेरले कडकडीत बंद

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

परभणी घटनेच्या निषेधार्थ नागाव,हेरले आणि येथील बौद्ध समाजाच्या वतीने कडकडीत गाव बंद पाळून निषेध व्यक्त करण्यात आला.परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिमेची एका माथेफिरूने विटंबना केल्याच्या निषेधार्थ हातकणंगले तालुक्यातील,नागाव,हेरले येथील समस्त बौद्ध समाजाच्या वतीने गावातून रॅली काढत गाव बंदचे आव्हान करण्यात आले होते.या आव्हानाला प्रतिसाद देत गावातील व्यापारी वर्ग,ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी पाठिंबा व्यक्त करत गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून निषेध व्यक्त केला यावेळी दोन्ही गावांमध्ये बंद शांततेत पाळण्यात आला.सकाळी दहा वाजता बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्यांनी निषेध सभा घेऊन घटनेचा तीव्र निषेध केला.यावेळी शिरोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी ही गावातील व्यापाऱ्यांना व बौद्ध समाजातील कार्यकर्त्यांना गाव शांततेत बंद पाळण्याचे आवाहन केले.यावेळी सुनील सुर्यवंशी यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व जमलेल्या सर्व भिमसैनिक ग्रामस्थांना परभणी येथील घटनेचा निषेध व्यक्त केला.या आंदोलनात मयत सोमनाथ सुर्यवंशी श्रद्धांजली अर्पण करून बंद आवाहन करण्यासाठी मोटारसायकल रॅलीला सुरुवात झाली.रँली नागाव,नागाव फाटा आंबेडकर नगर संभाजी नगर शिवाजी नगर व समता नगर मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली.यावेळी उपस्थित घटनेचा निषेध व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.

error: Content is protected !!