अरुण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

Spread the love

कुंभोज / प्रतिनिधी

कुंभोज तालुका हातकणंगले येथे वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांच्या 58 व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटन सकाळी सात वाजता युवा नेते आदित्य पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी रक्तदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अरुण पाटील युवा मंचाचे कार्यकर्ते तसेच गावातील तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती लावली होती. वारणा दूध संघाची संचालक अरुण पाटील हे वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी दिवसभर उपलब्ध नसल्याने परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी फोन द्वारे अरुण पाटील यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार विनय कोरे, आमदार अशोकरावजी माने, माजी आमदार माजी महादेव रावजी महाडिक, आमदार अमल महाडिक ,खासदार धैयशील माने, गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रदीप सामंत ,केबीसी बँकेचे संचालक विकास माने तसेच अनेक सामाजिक राजकीय शेती क्षेत्रातील मान्यवर आणि फोनवरून अरुण पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!