बांगलादेशमध्ये हिंदू समाजावरील अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनेचा मोर्चा

Spread the love

हातकणंगले / प्रतिनिधी

हातकणंगले तालुक्यातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या समाजावर वरील अत्याचाराच्या निषेधार्थ

आज मंगळवार दिनांक 10 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता हातकणंगले तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला.बांग्लादेश मध्ये अल्पसंख्याक हिंदूवर होत असलेल्या अत्याचारावर संपूर्ण जगभरातून टीका होत आहे.संन्यासी चिन्मयकृष्ण दास यांनी अल्पसंख्याक हिंदू वरील अत्याचाराचा निषेध केला म्हणून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला टाकून त्यांना अटक करण्यात आले आहे.सदर घटनेचा निषेध एक राष्ट्र म्हणून भारत सरकारने देखील केला आहे.बांग्लादेशमध्ये ४ ते २० ऑगस्ट दरम्यान ५० जिल्हांमध्ये हिंदूसमाजावर २००० हून अधिक जातीय हल्ले झाले.यामध्ये हिंदू सण, हिंदूसमाजाचे व्यवसाय आणि हिंदूसमाजाची मंदिरे यांच्यावरील हल्ल्यांचा समावेश आहे.दरम्यानच्या हल्ल्यांमध्ये असंख्य हिंदूबांधवांची घरे आणि व्यवसाय जाळून,उध्वस्त करून अल्पसंख्याक हिंदूसमाजाला रस्त्यावर आणले आहे.बांग्लादेशमधील हिंदूविरोधी भावना एवढ्‌या टोकाला गेली आहे कि,हिंदू महिलांवर सामुहिक बलात्कार झाल्याच्या घटनापुढे आल्या आहेत. अल्पसंख्याक हिंदूवरील अत्याचाराच्या विरोधात भारतातील हिंदूसमाजात प्रचंड रोष आहे.हिंदूसमाजात असलेला रोष “मानवाधिकार मूकमोर्चाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे.बांग्लादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूबांधवांवर होत असलेले अत्याचार थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य अशी भूमिका घेवून अल्पसंख्याक हिंदू हिताचे योग्य ते पाऊल उचलावे अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

error: Content is protected !!