इचलकरंजी / प्रतिनिधी
घरफोडीतील रेकॉर्डवरील सराईत चोरट्यांना शहापूर पोलिसांनी गजाआड केले आहे. किरण सुभाष पाटील (वय 34 रा. राणाप्रताप चौक गावभाग) व विनायक गजानन कुंभार (वय 26 रा. लोहार गल्ली गावभाग) अशी त्यांची नांवे आहेत. त्यांच्याकडून 59 ग्रॅम वजनाचे 4 लाख 60 हजार 200 रुपयांचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली 20 हजाराची मोपेड असा 4 लाख 80 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरिक्षक सचिन सुर्यवंशी यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, डेक्कन प्रोसेसच्या पिछाडीस असलेल्या शहापूर परिसरात 25 ते 27 जुलै या कालावधीत भरदिवसा घरफोडी झाली होती. त्यामध्ये चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने असा मुद्देमाल लंपास केला होता. या घरफोडीसह परिसरातील अन्य गुन्ह्यांचा तपास सुरु असताना शहापूर पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांना मिळालेल्या माहितीवरुन किरण पाटील व विनायक कुंभार या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे कसून केलेल्या चौकशीत दोघांनी तीन घरफोडीची कबुली दिली. तसेच चोरलेला मुद्देमालही काढून दिला. त्यांच्याकडून शहापूर, शिरोळ आणि जयसिंगपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन घरफोड्या उघडकीस आल्या आहेत. त्यांच्याकडून 4 लाख 60 हजार रुपयांचे 59 ग्रॅम वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली अॅक्टिव्हा मोपेड असा 4 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील किरण पाटील याच्यावर घरफोडीचे तीन तर विनायक कुंभार याच्यावर पूर्वीचे 24 गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलिस निरिक्षक सचिन सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलिस अंमलदार अविनाश मुंगसे, असिफ कलायगार, रोहित डावाळे, आयुब गडकरी, शशिकांत ढोणे यांच्या पथकाने केली.