डॉ.बाबासाहेबांचे जाज्वल्य विचारच देशाला तारु शकतील – दिलीप शिरढोणे

Spread the love

दत्तवाड / प्रतिनिधी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्ञानाचा अमृतकुंभ होय.भविष्याचा वेध घेवून मोठया मेहनतीने देशहिताचा विचार करून सर्वसामान्यांचे अधिकार अबाधित ठेवणाऱ्या संविधानाची निर्मिती केली आहे.समाजातील सर्व घटकांचा सारासार विचार करुन लोकशाही राज्यव्यवस्थेचा अंगीकार करण्यात आला आहे.केवळ जयंती व महानिर्वाण दिन या दिवशीच महामानवांच्या विचारांची उजळणी न करता त्यांचे विचार अंमलात आणणे ही काळाची गरज बनली आहे.आजच्या परिस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे जाज्वल्य विचारच देशाला तारू शकतील असे प्रतिपादन मुख्याध्यापक दिलीप शिरढोणे यांनी केले.विद्या मंदिर बांबरवाडी,दत्तवाड येथे आयोजित महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित बालसभेत मार्गदर्शन करीत होते.डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी ही आपले विचार व्यक्त केले.आभार अध्यापक निलेश राजाराम माने यांनी मानले.

error: Content is protected !!