खोकला देवीला सांगितलं तर तर तुमचा खोकला नक्की बरा होतो

Spread the love
भारतात अनेक मंदिरे आहेत त्याठिकाणी अनेक रहस्यमय घटना घडल्या आहेत.आज आपण पहाणार आहोत तुम्हाला खोकला झाला असेल आणि हे जर तुम्ही खोकला देवीला सांगितलं तर तर तुमचा खोकला नक्की बरा होतो अशी येथील भक्तांची धारणा आहे प्रभादेवीला असलेले हे खोकला मंदिर खूप प्रसिद्ध आहे प्रभादेवी ही देवी 12 व्या शतकातील मूळची शाकंबरी ही देवी आहे.मुगल आणि पोर्तुगीजांनी या देवीवर आक्रमण केलं होत पण या आक्रमणातून वाचून देवीच्या मूर्तीला बांद्राच्या एका विहिरीत लपवून ठेवले होते.एके रात्री पाठारे प्रभू समाजाच्या शाम नायक यांच्या स्वप्नात ही देवी आली व त्यांना सांगितले की विहिरीतून माझी मूर्ती काढून त्याची प्राणप्रतिष्ठा एका मंदिरामध्ये कर देवीच्या आदेशाचे पालन करून इसवी सन 1715 मध्ये या मंदिराचा बांधकाम करण्यात आलं.पाठारे प्रभू यांनीही देवीची मूर्ती शोधून काढली म्हणून या देवीचे नाव प्रभादेवी असे ठेवण्यात आले.याच मंदिरामध्ये शितलादेवी व खोकला देवीची मूर्ती आहे तुम्हाला खोकला झाला असेल किंवा एखादा जुना आजार झाला असेल आणि हे जर तुम्ही देवीला सांगितलं तर तुमचा खोकला आणि आजार पूर्णपणे नष्ट होतो अशी इथली भक्ताची श्रद्धा आहे.जागृत असलेल्या या देवीची शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी यात्रा भरते त्या दिवशी देशभरातील भक्त दर्शनासाठी येत असतात.
error: Content is protected !!