दानोळी परिसरात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

Spread the love

दानोळी / प्रतिनिधी

दानोळी तालुका शिरोळ येथे भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन पदभार स्वीकारल्याबद्दल लाडु वाटप करून आनंदत्सव साजरा करण्यात आला.देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.याच्या आनंदत्सवात भारतीय जनता पार्टी शिरोळ तालुक्याचे नेते माधवरावजी घाटगे याच्या मार्गदर्शनाने व संयोजक विजय जयसिंग भोजे(सर) ,तालुका अध्यक्ष मुकुंद गावडे यांच्या सहकार्याने भारतीय जनता पार्टी दानोळी शाखेच्या वतीने साखर,पेढे,लाडू वाटप करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी फटाक्याची आतेषबाजीसह घोषनेने परिसर दनानुन गेला होता.यावेळी दानोळीसह,कोथळी, निमशिरगाव, कवठेसार, जैनापुर, तमदलगे गावचे सर्वभारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी बुथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख, ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!