बैलगाडी,अंगत,ट्रॅक्टर ट्रॉली वाहनांना रिफ्लेक्टर – सपोनि फडणीस

Spread the love

टाकळीवाडी / प्रतिनिधी

ऊस वाहतूक करताना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बैलगाडी,अंगत गाडी, ट्रॅक्टर ट्रॉली वाहनांना रिफ्लेक्टर तसेच पाठीमागे फ्लोरेसेंट लाल रंगाचे कापड बसवावे असे आवाहन कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांनी आज गुरूवार दिनांक 5 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता टाकळीवाडी येथील गुरुदत्त साखर कारखान्याला ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर ट्रॉली, बैलगाड्या चालकांसाठी वाहतूक सुरक्षा प्रबोधन करताना केले.फडणीस म्हणाले, ऊस वाहतुक करणाऱ्या बैलगाडी व वाहन धारकांनी अपघात होईल असे वाहनांत अधिक ऊस भरणे, एकापेक्षा जास्त ट्रेलर जोडून ऊस वाहतूक करणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे,दारू पियुन वेगाने व निष्काळजीपणाने वाहन चालवू नये असे आवाहन ऊस वाहतूकदारांना केले. गुरुदत्त कारखाना येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर,ट्रॉली आणि बैलगाडी ऊस वाहतूक करणाऱ्या बैल गाडी,ट्रॉली यांना रिफ्लेक्टर लावण्यात आले.यावेळी सागर खाडे,शहाजी फोंडे,फारूक जमादार यांच्यासह बैलगाडी चालक व वाहनधारक उपस्थित होते.

error: Content is protected !!