पेट्रोल भरून झाल्यानंतर अचानक टू व्हिलर पेटली

Spread the love

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी कोल्हापूर रोडवर असणाऱ्या कबनूर गावाजवळ एचपी पेट्रोल पंपावर आज बुधवार दिनांक 4 डिसेंबर रोजी रात्री साडे सातच्या सुमारास पेट्रोल पंप भरण्यासाठी आलेल्या टू व्हीलरने पेट्रोल भरून झाल्यानंतर  अचानकपणे पेट घेतला.पण पेट्रोल पंपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना गाडी विजवण्यात यश आले.त्यामुळे मोठा अनर्थ टाळा पेट्रोल पंपावर गाडी अचानकपणे पेट घेतल्यामुळे पेट्रोल पंप परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. पेट्रोल पंप कर्मचारी यांनी प्रसंग अवधान दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टाळला, वेळेत गाडी विजवल्यामुळे पेट्रोल पंपला होणार धोका व जीवितहानी टळली.या घटनेमुळे कबनूर परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.पेट्रोल पंपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेले धाडस व वेळेत आग विजल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होऊ लागले आहेत. आगीत टू व्हीलर जळून खाक झाल्याने गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

error: Content is protected !!