अब्दुल लाट / प्रतिनिधी
अब्दुललाट ता.शिरोळ येथील घरफोडी करून दीड लाखाचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल चोरी केले.प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांनी 24 तासाच्या आत दोन आरोपींना जेरबंद करत त्यांच्या मुसक्या आवळल्या ओंकार चंद्रकांत परीट वय.21,रा गणपती मंदीरजवळ, अब्दुललाट,योगेश प्रदीप कांबळे (वय.22 वर्षे रा लोणार वेस,अब्दुललाट अशी संशयित आरोपींची नावे आहेत.सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली या चोरीचा छडा लावण्यासाठी उपनिरीक्षक सागर पवार,अनिल चव्हाण, राजेंद्र पवार,शिरीष कांबळे, गोपाळ तेली,शहाजी फोंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.अब्दुललाट येथील डॉ.पुरूषोत्तम कुलकर्णी यांच्या हॉस्पिटल मधील राहत्या घरात 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरच्या कालावधीत त्यांच्या घरी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील बेडरूमधील लोखंडी तिजोरीचा दरवाजा कशाने तरी उचकटून,सोन्याचे मनी मंगळसूत्र, साखळी, बांगड्या असा 1 लाख 50 हजाराचा मुद्देमाल चोरुन नेल्याचे मंगळवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हा चोरीचा प्रकार उघडकीस आला.चोरीची फिर्याद डॉ. कुलकर्णी यांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात दिली होती. पथकाने परिसरातील सी.सी.टीव्ही फुटेज, खबऱ्यांच्याकडून मिळालेली माहिती केलेला कसून तपास केला असता हे दोघे संशयीत आरोपींची नावे निष्पन्न झाली.सायबर विभागाचे सागर खाडे यांनी त्यांच्या मोबाईल लोकेशन प्राप्त करून मुद्देमालासह आज बुधवार रंगेहात पकडून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे.अधिक तपास कुरुंदवाड पोलीस करत आहेत.