गत हंगामातील तुटलेल्या ऊसाला २०० रुपये व चालू गळीत हंगामाला ३७०० रुपये ऊस दर मिळाला पाहिजे या मागणीसाठी आंदोलन संघटनेच्या वतीने केली.दोन दिवस शिरोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेमुदत उपोषण सुरू आहे.उपोषनाच्या पार्श्वभूमीवर शिरोळचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी सोमवार दिनांक २ डिसेंबर रोजी उपोषणस्थळी भेट देऊन आज मंगळवार दिनांक ३ डिसेंबर रोजी साखर कारखानदार व आंदोलन अंकुश संघटनेची संयुक्त बैठक शिरोळ येथील तहसील कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती.आजच्या बैठकीला गुरुदत्त टाकळीवाडी,श्री दत्त शिरोळ,जवाहर कारखाना हुपरी,पंचगंगा इचलकरंजी व शरद कारखाना नरंदे या कारखानदारांचे कार्यकारी संचालक,तहसीलदार अनिलकुमार हेळकर व आंदोलन अंकुशचे प्रमुख दीपक पाटील यांची संयुक्त बैठक पार पडली.मात्र या बैठकीत मागील २०० व चालू हंगामासाठी ३७०० रुपये यावर कोणतीही सकारात्मक चर्चा न झाल्याने ही बैठक फिस्कटली असून आलेल्या कार्यकारी संचालकांनी मॅनेजमेंट बरोबर चर्चा करून ५ डिसेंबर रोजी निर्णय देऊ असे आश्वासन दिल्याने आंदोलन अंकुश संघटना आपल्या आंदोलनावर ठाम आहे.तर ऊस दर संदर्भात ५ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता पुन्हा बैठक घेण्याचे पत्र दिले आहे.ऊस दरावर तात्काळ निर्णय न झाल्यास पुढील आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलन अंकुश संघटनेचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील यांनी आज
शिरोळ येथे दिला आहे.त्यामुळे आता ऊस आंदोलनाला आणखीन उग्र स्वरूप मिळणार असल्याचे दिसून येत आहे.