शिरोळ / प्रतिनिधी
जयसिंगपूर येथील बॅ. बाळासाहेब खर्डेकर शिरोळ तालुका शिक्षक व शिक्षकेतर सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित जयसिंगपूर या संस्थेच्या तज्ञ संचालकपदी शिरोळ पंचायत समिती शिक्षण विभागाकडील परिचर श्री.विश्वनाथ जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली.या निवडीबद्दल उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सुकाणू समितीचे रविकुमार पाटील,सुनिल एडके,महेश देशमुख,सुदर्शन कोळी,रईसअहमद पटेल, किरण पाटील,महमंदहानिफ मुल्ला,कुबेर गावडे, प्रकाश बुरुटे,कृष्णात आंबी,संस्थेचे चेअरमन कुमार सिदनाळे, व्हा.चेअरमन प्रकाश पुजारी,संचालक बबलू सनदी,उत्तम कोळी,संतोष कोळी,अरुण कदम,विलास जानकर,नियाज पटेल,सुधीर पाटील,रमेश बन्ने,चंद्रकांत कोरे,जोत्स्ना कटकोळे,उषा सुतार,विजया पाटील,मनिषा पंढरपूरे, सेक्रेटरी सुनिल सिदनाळे यांचेसह सभासद,कर्मचारी उपस्थित होते.