श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूसानिमित्त शर्यती व स्पर्धा उत्साहात
शिरोळ / प्रतिनिधी
श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूसानिमित्त आयोजित गावातील कामाठी बैलगाडी शर्यतीत शिरोळच्या महेश भोसले यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.येथील ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूस अमाप उत्साहात व धार्मिक वातावरणात संपन्न होत आहे. श्री बुवाफन महाराज उत्सवाची सांगता होऊन हजरत नूरखान बादशाह उरूसास भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली.बुधवारी उत्सव व उरूसानिमित्त आयोजित कामाठी बैलगाडी, खुला बैल पळविणे, घोड्यावर बसून शर्यत, तसेच महिला व पुरुष गटातील स्केटिंग स्पर्धा,गाडी मागून श्वान पळविणे स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धा व शर्यती पाहण्यासाठी शर्यती शौकिनानी मोठी गर्दी केली होती.विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते निशान रोख रक्कम व कायम चषक बक्षीस म्हणून देण्यात आले.गावातील कामठी बैलगाडी शर्यत-प्रथम-महेश भोसले,द्वितीय-अर्जुन जाधव अर्जुन जाधव, तृतीय-अनिल बिसूरे.खुला बैल पळविणे-प्रथम-सागर कोळी,द्वितीय-विजय माने,तृतीय-दिनेश जगदाळे.घोड्यावर बसून शर्यत-प्रथम-अली सय्यद (जयसिंगपूर), द्वितीय-अनिल शिंगाडे (रुकडी),तृतीय-अनिकेत पाटील ( इंगळी),पुरुष गट खुल्या स्केटिंग स्पर्धा-प्रथम- रोहन माळी, द्वितीय- हर्षवर्धन दबडे, तृतीय- देवराज मधाळे,महिला खुल्या स्केटिंग स्पर्धा- प्रथम- निवेदिता शिंदे,पुरुष इनलाईन स्केटिंग स्पर्धा- प्रथम- पियुष मेहतर, द्वितीय- वेदांत वासुदेव, तृतीय- श्लोक काशीद. महिला इनलाईन स्केटिंग स्पर्धा- प्रथम- निधी ऐनापुरे, द्वितीय- निवेदिता शिंदे. गाडी मागून श्वान पळविणे-प्रथम-सुरज पाटील नागदेववाडी यांचा जान श्वान, द्वितीय-हालसिद्धनाथ प्रसन्न गाडेगोंडवाडी यांचा यांचा वाईन्स श्वान, तृतीय-समाधान मेजर कानडवाडी यांचा रेडवाईन्स श्वान.