राजर्षी शाहू नगर वाचनालयात भारतीय संविधानचा जागर

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ येथील राजर्षी शाहू नगर वाचनालयाच्या वतीने भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झालेबद्दल भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पुजन पांडुरंग पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.दिपप्रज्वलन शामराव माने,हरी तुकाराम पाटील,मुरलीधर गायकवाड,चंद्रकांत पाटील,एम.एस.गवंडी,कु.मयुरी बावडेकर, कु.सानिका वंडर यांचे हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वाचनालयाचे कार्यवाह धनाजीराव जाधव होते. संविधानचे वाचन कु.मयुरी बावडेकर हिने केले.संचालक चंद्रकांत माने गावडे म्हणाले आज संविधान दिवस आहे. संविधान आहे म्हणून आपण आहोत.आपल्यावर हे उपकार डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या समितीच्या सहकार्याचे आहे.आपले संविधान जगातील सर्वात मोठे राष्ट्रीय संविधान आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या घटनेची प्रत संविधान सभेचे अध्यक्ष डॉ राजेंद्र प्रसाद यांचेकडे सुपुर्द केले. संस्थेच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लिहिलेल्या ग्रंथाचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे.शिरोळ नगरपरिषदेच्यावतीने संविधान रॅली काढण्यात आली.या रॅलीत कार्यवाह धनाजीराव जाधव,संचालक चंद्रकांत माने गावडे,ग्रंथपाल संभाजी चव्हाण,वाचक,सभासदानी सहभाग घेतला होता.यावेळी खंडेराव हेरवाडे,रणजित काळे,आदित्य गुरव,विश्वास बिदंगे,अनिकेत कोळी, शिवाजी वंडर,महेश पाटील,राजगोंडा आवळे, अशोक पाटील यांच्यासह वाचक,सभासद उपस्थित होते.

error: Content is protected !!