गणेशवाडीकरांचे गणपतराव पाटील यांना मिळणार मोठं पाठबळ

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

गणेशवाडी (ता. शिरोळ) येथे महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारासाठी पदयात्रा काढण्यात आली.ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत गणपतराव पाटील यांना बहुमताने निवडून देण्याचा विश्वास दिला.पदयात्रे नंतर आप्पासो गावडे यांच्या अध्यक्षतेखाली कॉर्नर सभा घेण्यात आली.गणपतराव पाटील यांनी आपल्या कामाचा आढावा घेऊन मला जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद मोठ्या प्रमाणात मिळत असून जनतेच्या पाठबळावरच माझा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला.बी.जी.पाटील, दस्तगीर कोरबू, विलास कांबळे, स्वाती सासणे, दिगंबर सकट, हसन देसाई, प्रा.चारुशीला तासगावे, कु.जागृती पाटील, कु, निहारिका शिंदे आदींनी मनोगत व्यक्त करून गणपतराव पाटील यांना निवडून देऊन महाविकास आघाडीच्या पाठिशी खंबीरपणे राहण्याची विनंती केली.स्वागत व प्रास्ताविक राजेंद्र देवताळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.कुमार पाटील यांनी केले.गजानन गाताडे यांनी आभार मानले.कारखाना संचालक विश्वनाथ माने, भैय्यासाहेब पाटील, ज्योतीकुमार पाटील अनंत धनवडे, परवीन जमादार, राजेंद्र प्रधान, गणेश पाखरे, रेखा पाटील, राजश्री मालवेकर, वसंतराव देसाई, गुरुलिंग अनुरे, दिलीप डफळापुरे, विजयकुमार गाताडे, दादासो देवताळे, आण्णासो शिंदे, आप्पासो मडीवाळ, राहुल कोळेकर, आण्णासो जमादार, चंद्रकांत गाताडे, राजेंद्र देवताळे, राजेंद्र तासगावे, मल्लाप्पा अंकलखोपे, शरद कांबळे, कुमार कांबळे, कुमार बेडक्याळे, अनिल बिरनाळे, गजानन भुशिंगे, परशुराम लोंढे, परशुराम गौराजे, मनोहर उदगावे, बाबुराव उदगावे, मल्लाप्पा खटावे, सतीश भुशिंगे, विजय भुशिंगे, रावसाहेब शिंदे, सुरेंद्र बिरनाळे, चंद्रकांत कोथळे, संजय वासकर, आप्पासो गावडे, हल्लाप्पा गावडे, सुरेश शिरगावे, भूपाल बेळगावे, सदाशिव मगदूम यांच्यासह मविआ चे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!