शिरोळ / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील महिला सुरक्षित नाही.ज्या महिलांनी देशाचे नाव उज्वल केले त्या महिलांचा भाजपा सरकारने अपमान केला.महिलांच्यावर अत्याचार करणाऱ्यांचा सत्कार करून त्यांना पक्षात सामील करून घेतले.अशा भाजप सरकारला सत्तेतून खाली खेच असे आवाहन खानपूरच्या माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी केले.त्या पुढे म्हणाल्या लाडकी बहीण योजना कर्नाटकात काँग्रेस पक्षाने पहिल्यांदा लागू केली त्याच पद्धतीने हिमाचल प्रदेश,तेलंगणा या राज्यातही काँग्रेस पक्षांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत.यामुळे जनतेत काँग्रेस पक्षाबद्दल सहानुभूती व आदराची भावना निर्माण झाली आहे.याची धास्ती घेऊन महाराष्ट्र राज्यातही लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांना पाठिशी घालायचं हे या राज्यात सुरू आहे.त्यामुळं राज्यातील महिला व लहान मुलांची सुरक्षितता गंभीर बनली आहे.याचा विचार करण्याची वेळ आली आहे. कर्नाटक राज्यात पाच योजना जनतेसाठी सुरू केले आहेत.त्याच योजना काँग्रेस पक्ष महाराष्ट्र राज्यात सुरू करणार आहे.यामुळे राज्यातील जनतेने महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहून सर्व उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.