कोथळी / प्रतिनिधी
स्वाभिमानी शेतकरी संघटना वटवृक्षाप्रमाणे महाराष्ट्रावर पसरली,मात्र सध्या राजकीय मंडळीकडून संघटनेच्या वटवृक्षाच्या फांद्या,मूळ तोडण्याचं प्रयत्न केला जातोय, संघटनेच्या माध्यमातून गेली वीस पंचवीस वर्षे शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी प्रामाणिकपणे आंदोलन करत असताना स्वाभिमानीचे लचके तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोथळी येथे केला.यावेळी शेट्टी पुढे म्हणाले शेतकऱ्यांसाठी अनेक रक्तरंजित संघर्ष केले.मात्र सध्याच सुरू असलेले घाणेरडे राजकारण सुरु आहे,असे राजकारण यापूर्वी कधी झालेले नाही,त्यामुळे राजकीय मंडळींनी या शेतकरी चळवळीला नक लावण्याचे एक प्रयत्न तरी करू नका,काही मंडळी म्हणत आहेत.शेतकरी संघटनेला पूर्वीची धार राहिलेले नाही ती संपली आहे असे समजून संघटनेतील काही लोकांना फोन करून बोलवून घेऊन धमक्या दिल्या जात आहेत.धमक्या देणाऱ्यांनी समजून घ्यावं गैर मार्गाने गोळा केलेल्या पैशाच्या जोरावर जर सर्वसामान्य लोकांना मस्ती करण्याचा प्रयत्न केला हा तुमचा वाडा उध्वस्त करण्याला वेळ लागणार नाही असा गर्भित इशारा देत टायगर अभी जिंदा है लक्षात ठेवावे असा टोला विरोधकांना राजू शेट्टी यांनी लगावला आहे.