“ब्रेकिंग बातमी” भाजपाचे शंकर जाधव यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

Spread the love

भाजपाचे शंकर जाधव यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
महाविकास आघाडीचे गणपतराव पाटील यांचा विजय निश्चित : अमरसिंह निकम

जयसिंगपूर / प्रतिनिधी

शिरोळ तालुका ज्येष्ठ नागरिक आघाडी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष शंकर जाधव यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.जयसिंगपूर शहर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष अमरसिंह निकम यांच्या हस्ते शंकर जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रकांत जाधव-घुणकीकर,सलीम नदाफ, दीपक भोसले,वीरशेन निकम,माजी नगरसेवक कॉ.रघुनाथ देशिंगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना जयसिंगपूर शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष अमरसिंह निकम म्हणाले की शिरोळ तालुक्यात परिवर्तनाची लाट निर्माण झाली आहे. यामुळे अनेक जण काँग्रेस पक्षावर विश्वास दाखवून तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकरिता या पक्षात सामील होत आहेत. महाविकास आघाडीचे व काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार गणपतराव पाटील यांची उमेदवारी ही जनतेतून आलेली उमेदवारी आहे.तालुक्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध आहे. वाढती महागाई बेरोजगारी महिला संरक्षण कायदा व सुव्यवस्था या ज्वलंत प्रश्नामुळे राज्यातील जनता बेजार झाले आहे.यामुळे राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणे काळाची गरज बनली आहे.भाजपाचे शंकर जाधव यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून गणपतराव पाटील यांना पाठिंबा दर्शवला आहे.त्यांच्या येण्यामुळे जयसिंगपूर शहरात काँग्रेस पक्षाची ताकद वाढली आहे.या शिरोळ विधानसभा मतदारसंघातून गणपतराव पाटील यांचा विजय निश्चित आहे.

error: Content is protected !!