गणपतराव पाटील यांना डी.एड.बी.एड. सुशिक्षित बेरोजगार कृती समितीचा पाठिंबा

Spread the love

जयसिंगपूर / प्रतिनिधी

महाविकास आघाडीचे आधिकृत उमेदवार, उद्यानपंडीत गणपतराव पाटील (दादा) यांना डी. एड. बी.एड. सुशिक्षित बेरोजगार कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विधानसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा देण्यात आला.शिरोळ विधानसभा मतदारसंघामध्ये २०२४ ला होवू घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भात डी. एड. बी.एड. सुशिक्षित बेरोजगार कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शिरोळ तालुक्यातील महाविकास आघाडीचे आधिकृत उमेदवार गणपतराव पाटील (दादा) यांच्या संयमी व आक्रमक नेतृत्वाला स्वीकारून जाहिर पाठिंबा देण्यात आला.येणाऱ्या काळामध्ये डी. एड. बी. एड. सुशिक्षित बेरोजगार कृती समितीच्या मागण्यांसंदर्भात पाठ पुरावा करून योग्य तो न्याय द्यावा व सर्व पदाधिकाऱ्यांना योग्य तो मान सन्मान मिळावा व कोणत्याही अडचणीमध्ये आपली सहकार्याची भूमिका प्रमाणिकपणे असावी अशी विनंती कृती समितीने केली. यावर गणपतराव पाटील यांच्या वतीने यावेळी शेखर पाटील यांनी समितीचे आभार मानून त्यांच्या अडीअडचणी मध्ये सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
यावेळी पदमाकर देशमुख,विद्यासागर ढोबळे,प्रा.प्रकाश इंगवले,सुहासिनी रासाटे व स्वाती वाडेकर उपस्थित होते.

error: Content is protected !!