शिरोली येथे परप्रांतीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love

परप्रांतीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

येथील यादववाडीमध्ये भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका परप्रांतीय तरुणाने घराच्या छतास असलेल्या लोखंडी हुकाला टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली. कपील रॉय (वय २३, मूळ रा. राजस्थान, सध्या रा. गदग यांच्या भाड्याच्या घरी, यादववाडी, पुलाची शिरोली) असे त्याचे नाव आहे. आत्महत्येची ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली. याची नोंद पुलाची शिरोली औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात झाली आहे.

error: Content is protected !!