शेट्टी,पाटील,मिणचेकर जरांगे यांच्या भेटीला तर आमदार यड्रावकर मतदारांच्या भेटीला

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे -पाटील यांची आज शनिवार भेट घेतली.यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, शिरोळ विधानसभेचे स्वाभिमीनीचे उमेदवार माजी आमदार उल्हास पाटील व हातकंणगले विधानसभा मतदारसंघाचे स्वाभिमानीचे उमेदवार माजी आमदार सुजित मिणचेकर यांचेसह स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते.परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून स्वाभिमानी पक्षाच्यावतीने राज्यातील २३ विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. राज्यातील बहुसंख्य शेतकरी हा मराठा समाजाचा आहे.सरकारच्या धोरणामुळे शेती तोट्यात गेलेली आहे.अल्पभुधारक असणारा शेतकरी आर्थिकदृष्ट्या पिचलेला आहे.यामुळे सध्या मराठा समाजाला आरक्षण देणे गरजेचे आहे.यामुळे शेतकरी चळवळीच्या माध्यमातून राज्यातील विविध मतदारसंघातील उमेदवारांना सहकार्य करावे अशी विनंती राजू शेट्टी यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन केली.

error: Content is protected !!