गणपतराव पाटील यांनी घेतल्या मतदारांच्या गाठीभेटी

Spread the love

उद्यानपंडित गणपतराव पाटील यांचा विजय निश्चित – अनिलराव यादव

शिरोळ / प्रतिनिधी

उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी शेतकरी हित जोपासण्याबरोबरच सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले आहेत.शिरोळ तालुक्याचा शाश्वत विकास त्यांच्या हातून निश्चितपणे घडेल असा विश्वास तालुक्यातील जनतेत आहे.यामुळेच तालुक्यातून त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता शिरोळ विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास शिरोळ तालुक्याचे ज्येष्ठ नेते आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव यांनी व्यक्त केला.शिरोळ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी शुक्रवारी शिरोळ शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांसह मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.यावेळी पाटील यांना भेटण्यासाठी प्रत्येक ठिकाणी सर्व स्थरातील नागरिकांबरोबर मतदारांनी मोठी गर्दी केल्यामुळे या परिसराला जत्रेच्या स्वरूप प्राप्त झाले.सर्वत्रच गणपतराव पाटील यांचे उत्साह स्वागत करण्यात आले. महिलांनी औक्षण करून त्यांना निवडणुकीत विजय होण्याचा शुभेच्छारुपी आशीर्वाद दिला.तरुणांनी दादा यावेळी वेळेला आम्ही तुमच्या सोबतच असा विश्वास व्यक्त केला.गणपतराव पाटील यांनी क्षारपड मुक्त जमीन प्रकल्प राबवून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य मिळवून दिले आहे.रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून सुशिक्षतांना रोजगार मिळवून देण्याचा सातत्याने प्रयत्न केला.सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहे.निष्कलंक निस्वार्थी सर्वांना सोबत घेऊन जाणारा आपला हक्काचा माणूस अशी त्यांची प्रतिमा जनतेत निर्माण झाली आहे.यामुळे तालुक्यातील जनतेने परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला आहे. शिरोळ विधानसभेच्या निवडणुकीत उद्यानपंडित गणपतराव पाटील यांचा विजय निश्चित आहे.असे मत यावेळी बोलताना अनिलराव यादव यांनी व्यक्त केले.यावेळी युवानेते पृथ्वीराजसिंह यादव,विराजसिंह यादव,श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक दरगु गावडे,माजी सरपंच गजानन संकपाळ,माजी नगरसेवक पंडित काळे,इम्रान आत्तार,विजय आरगे,बाळासाहेब कोळी,बापूसाहेब गंगधर,कृष्णा भाट,आप्पासाहेब जगदाळे,सिताराम शिंदे,ओंकार गावडे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!