इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे मदन कारंडे यांनी आज मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी साध्या पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.शहरातील सर्वच महापुरुषांच्या पुतळ्यांना हार घालून अभिनंदन करून काँग्रेस कमिटी कार्यालयापासून ते प्रांत कार्यालय पर्यंत चालत येऊन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.ही लढाई घराणेशाही,धन दांडग्यांच्या विरोधात आहे. तसेच जातीपातीचे राजकारणाच्या विरोधात ही आमची लढाई असल्याने आमचा विजय निश्चित आहे इचलकरंजी शहराचा पाण्याचा प्रश्न आम्हीच मिटवू माजी आमदारांनी पाण्याचा प्रश्न मिटला होता.पण सध्याचे आमदार यांनी इचलकरंजी पाण्याचा प्रश्नाला खोटा घातला असल्याचा उल्लेख करत मदन कारंडे यांनी आमदार प्रकाश आवाडे यांचे नाव न घेता टोला लगावला.