रोटरी क्लब ऑफ रिव्हर साईडच्यावतीने शुद्ध पेयजल उभारणी

Spread the love

कुरुंदवाड / प्रतिनिधी

खिद्रापूर तालुका शिरोळ येथे कोपेश्वर मंदिराच्या जवळ शुद्ध पेयजल प्रकल्प सुरू झाल्याने पर्यटकांच्या बरोबर ग्रामस्थांना देखील शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार आहे. ग्रामपंचायतीच्या सहकार्याने कुरुंदवाड रोटरी क्लब ऑफ रिव्हर साईड यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प यशस्वीपणे चांगला चालेल असे मत रोटरी क्लबचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिर बोरदसवाला यांनी व्यक्त केले.
रोटरी क्लब ऑफ रिव्हर साईड आणि खिद्रापूर ग्रामस्थ यांच्या सहकार्याने पर्यटकांच्या साठी आणि ग्रामस्थांच्या साठी शुद्ध पाणी मिळावे यासाठी हा प्रकल्प उभारण्यात आला.त्याचा उद्घाटन समारंभ रोटरी क्लबचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन नासिर बोरदसवाला यांच्या हस्ते असिस्टंट गव्हर्नर विद्यासागर आडगाने कुरुंदवाड रोटरी क्लब रिव्हर साईडचे अध्यक्ष विलास गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन समारंभ पार पडला.स्वागत व प्रास्ताविक शुद्ध पेयजल प्रकल्पचे चेअरमन रो दस्तगीर मोमीन यांनी केले पाहुण्यांचा सत्कार रोटरी रिव्हर साईडचे अध्यक्ष विलास गुरव यांनी केले.यावेळी रोटरी ग्रॅम सिटी जयसिंगपूरचे माजी अध्यक्ष टी.बी.पाटील,माजी निवृत्त न्यायाधीश अमोल देशपांडे,सुदर्शन कदम,संजय मानगावे,कुरुंदवाड रोटरी क्लबचे शिवाजी बाबर, खिद्रापूरचे प्रतिष्ठित नागरिक दयानंद खानोरे,ओम प्रकाश सातपुते यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.हिदायतुला मुजावर, सचिन अंबुजे, प्रोजेक्ट अधिनियम मनोगत व्यक्त केले.रोटेरियन प्रकाश नरोटे यांनी आभार मानले.

error: Content is protected !!