इचलकरंजी / प्रतिनिधी
जागतिक आर्किटेक्चर डे निमित्त इचलकरंजी येथील असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स & अर्किटेक्ट्स व ब्रिटीश पेंट्सचे डीलर नवभारत पेंट्स यांचे वतीने जागतिक आर्किटेक्चर दिन येथील राधे बैंक्वेट हॉल येथे उत्साहात संपन्न झाला.असोसिएशनचे अध्यक्ष इंजि. राजेंद्र खंडेराजी यांनी स्वागत केले.दीपप्रज्वलन व आर्कि. चार्ल्स कोरिया यांच्या प्रतीमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात झाली.असोसिएशनच्यावतीने ब्रिटीश पेंट्स चे दक्षिण व पश्चिम विभाग डी.जी.एम.अनुप कपूर तसेच कोल्हापूर ऑफिसचे शाखाधिकारी सुमित कुमार झा व कंपनीचे प्रतिनिधी पांडुरंग प्रधान,संतोष जाधव व नवभारत पेंट्सचे मालक शिरीष तेरवाडकर यांचा असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.
ब्रिटीश पेंट्स कंपनीचे प्रतिनिधी अनुप कपूर यांनी कंपनीच्या विविध प्रकारच्या पेंट्सबद्दल विस्तारपूर्वक स्लाईड शोच्या माध्यमातून माहिती दिली.तसेच कंपनीच्या येणाऱ्या नवीन उत्पादनाबाबत माहिती दिली.
प्रमुख वत्क्ते म्हणून बेळगावचे तरुण आर्कि.सुयश खानोलकर हे उपस्थित होते.आर्कि.सुयश खानोलकर यांचा परीचय जीवन घाटगे यांनी करून दिला.आर्कि. सुयश खानोलकर यांनी “आर्ट ऑफ स्पेस मेकिंग व किफायती बांधकाम”या बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. आपल्या जुन्या इमारीतीचे जतन करण्याबरोबर नवीन इमारती बांधताना जास्तीजास्त त्या भागातील उपलब्ध मटेरीअलचा वापर करून पर्यावरण पूरक इमारती उभा करण्याबाबतही मार्गदर्शन केले.याप्रसंगी असोसिएशनचे सचिव आर्कि.विकास नाईक,खजिनदार इंजि.नितीन शेट्टी,संचालक विठ्ठल तोडकर,गिरीश मोकाशी,सुहास रूगे,प्रकाश मालवीय,रवींद्र तोरस्कर,आशिया पटेल, तन्वी कुलकर्णी, विवेक सावंत व असोसिएशनचे माजी अध्यक्ष व सभासद उपस्थित होते.आभार प्रदर्शन सचिव आर्कि. विकास नाईक यांनी केले.सूत्र संचालन इंजि.जीवन घाटगे यांनी केले.