शिरोळ / प्रतिनिधी
येथील सामाजिक कार्यकर्त्या व राधा महिला सोशल फौंडेशनच्या खजिनदार अन्नपूर्णा विठ्ठल कोळी यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांना निवडीचे पत्र प्राप्त झाले आहे.शिरोळचे माजी उपसरपंच प्रताप उर्फ बाबा पाटील,जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती व विद्यमान संचालक विजयसिंह माने-देशमुख यांच्या प्रयत्नातून आणी शिरोळ तालुक्याचे आमदार व माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून सौ अन्नपूर्णा कोळी यांना विशेष कार्यकारी अधिकारी पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे.त्यांना निवडीचे पत्र जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते व प्रताप उर्फ बाबा पाटील विजयसिंह माने देशमुख यांच्या उपस्थितीत देण्यात आले.मिळालेल्या पदाचा योग्य तो वापर करून समाजहित जोपासले जाईल,असे मत यावेळी अन्नपूर्णा कोळी यांनी व्यक्त केले.