अन्यायाविरुद्ध,अत्याचाराविरुद्ध लढा द्या – स्नेहल कुलकर्णी पाहिजे –

Spread the love

मौजे आगर येथे नवरात्रोत्सव सोहळा उत्साहात

शिरोळ / प्रतिनिधी 

जायंट्स ग्रुप ऑफ दुर्गा सहेली मौजे आगर आणि अष्टविनायक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रोत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला.पार्वती हाऊसिंग सोसायटी येथे दररोज नऊ दिवस देवीची आरती झाल्यावर प्रसाद वाटप आणी परिसरातील महिला व मुली यांनी गरबा, टिपऱ्या खेळून हा नवरात्र उत्सव साजरा केला. अष्टमीच्या दिवशी पारंपारिक खेळ खेळले गेले. याच दिवशी टिपऱ्या आणि वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच विजयादशमीच्या दिवशी अष्टविनायक मंडळातर्फे वाईटावर चांगल्याची मात तसेच द्वेष मत्सर जाळून टाकावे यासाठी रावण दहन करण्यात आला. या उत्सवात जायंट्स फेडरेशन समन्वयिका डॉ.सौ स्नेहल कुलकर्णी यांनी.. अन्यायाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध नेहमी लढा दिला पाहिजे …स्त्रियांचा, मुलींचा नेहमी सन्मान केला पाहिजे ..यासाठी तत्पर असले पाहिजे तसेच वाईट प्रवृत्ती आणि विकृती यांचा नायनाट केला पाहिजे अशा प्रकारची सर्वांनी शपथ घ्यावी असे आवाहन केले. नवरात्रोत्सवाचा सोहळा यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी अष्टविनायक मंडळाचे अध्यक्ष ओंकार कुलकर्णी, सेक्रेटरी राज गोखले, विजय कोरे, निलेश कांबळे, खजिनदार रोहित पाटील , आशुतोष कोळी, अभिजीत पाटील, सौरभ जाधव, मंथन हाक्के , ऋषभ मुळे तसेच दुर्गा सहेलीच्या अध्यक्षा सौ अश्विनी नरुटे , खजिनदार ॲड. सौ. शर्मिला देशपांडे, सौ.संगीता जाधव , सौ. नलिनी देसाई, सेक्रेटरी प्रतिभा ढापरे,सौ. श्वेता पुजारी, सौ स्मिता पुजारी , सौ सीमा आपटे , सौ वर्षा गोखले , सौ सुजाता कल्लोळी , सौ आशा शहापुरे सौ वीणा चव्हाण, डॉ.सौ. श्रीदेवी नकाते , सौ चेतना कोरे, सौ प्रियांका कोरे, सौ निर्मला नाईक, सौ मंजुश्री महिंद, इत्यादींनी परिश्रम केले. स्पर्धांचे परीक्षण सौ प्राजक्ता देशपांडे कुलकर्णी यांनी केले .या नवरात्रोत्सवासाठी परिसरातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. अष्टविनायक मंडळातर्फे उपस्थित महिलांन उपहार देण्यात आला.

error: Content is protected !!