शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ शहर व परिसरातील ३५ सामाजिक कार्यकर्त्यांना, विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड करण्यात आली आहे. माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या हस्ते माजी नगरसेवक शरद मोरे बापू यांच्या अध्यक्षतेखाली व माजी नगरसेवक एन. वाय. जाधव व सुभाष माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधितांना निवडीचे पत्र देण्यात आले.जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहकार्याने माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या प्रयत्नाने विशेष कार्यकारी अधिकारी पदाची संधी कार्यकर्त्यांना देण्यात आली. भूषण गंगावणे, अभिजित माळी, प्रदीप खाडे, किरण माने गावडे, आप्पालाल चिकोडे, मयूर पाटील, निनाद भोसले, आशुतोष माळी, खलील कुरणे, इम्रान कोठीवाले, प्रविणसिंह माने, मारूती जाधव, विजय पाटील, राजू माने, तौफिक गवंडी, योगेश पाटील, युसुफ कुरणे, धनाजी गावडे, प्रथमेश पाटील, सौ. जयश्री पाटील, सौ. सारिका माने, सौ. सुजाता आवळे, शुभम घाटगे, सतिश ढवळे, दिपक थोरात, राहूल डोंगरे, रणजित चव्हाण, अजित पाटील, गजानन ढेकळे, अरूण आंबोळे, अमोल सुतार, भुजबळी चौगुले, गौस मुल्लाणी, सचिन राउत व अल्ताफ इनामदार यांना निवडीचे पत्र देण्यात आली.यावेळी बंटी संकपाळ, प्रविणसिंह माने, सौ. इंद्रायणी पाटील, सुनिल माने, अजिंक्य पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.