प्रथमाचार्य शांतीसागर मुनीमहाराज यांचे धार्मिक कार्य उल्लेखनीय – दलितमित्र अशोकराव माने

Spread the love

प्रथमाचार्य शांतीसागर मुनीमहाराज यांचे धार्मिक कार्य उल्लेखनीय- दलितमित्र अशोकराव माने

कुंभोज प्रतिनिधी / विनोद शिंगे 

नरंदे ता हातकणंगले येथील वीर सेवा दलाच्या वतीने प्रथमाचार्य शांतीसागर मुनीमहाराज यांच्या आचार्य पदारोहन शताब्दी निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा- जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने(बापू)यांच्या अध्यक्षतेखाली व हातकणंगले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.यावेळी आण्णासाहेब चौगुले,संघनायक प्रतीक देसाई,उपसंघनायक अनुराग देसाई,युवा नेते अक्षय देसाई यांसह युवा कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!